पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवून देशाबाहेर त्याचा प्रसार करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते लोकप्रिय गायक म्हणजे महेश काळे. उत्तम आवाजाच्या जोरावर महेश काळे यांनी कानसेनांना तृप्त केलं आहे. विशेष म्हणजे संगीताचा वारसा लाभलेले महेश काळे उत्तम अभिनेतेसुद्धा आहेत. कट्यार काळजात घुसली या नाटकात त्यांनी सदाशिव ही गाजलेली भूमिका केली आहे. त्यामुळे आज त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेक ठिकाणी महेश काळे यांच्या गाण्याचे कार्यक्रमही होत असतात.
येत्या ११ फेब्रुवारी २०२४ ला, म्हणजेच उद्या त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचं पनवेलमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. पनवेलमधील 'वासुदेव बळवंत फडके' नाट्यगृहामध्ये दुपारी ४.३० वाजता त्यांच्या संगीतमय सांज 'स्वर संध्या' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं तिकीट श्रोत्यांना Book My Show वरुन बूक करता येणार आहे. तसंच नाट्यगृहाच्या खिडकीवरही तिकीट उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यापूर्वी हा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे येथे सादर झाला आहे.
दरम्यान, माळा येथे १२ जानेवारी २९७६ मध्ये जन्मलेले महेश काळे यांनी त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेजमधून पूर्ण केलं. इलेक्ट्रिकल्स इंजिनियरिंगमध्ये त्यांनी पदवी संपादन केली आहे. तर मास्टर डिग्री इंजिनियरींग मॅनेजमेंट Santa Clara University (युनायटेड स्टेट्स) येथे झालं आहे. महेश काळे यांना त्यांच्या आईकडून मीनल देशपांडे आणि जितेंद्र अभिषेकी बुवा यांच्याकडून गायनाचे धडे मिळाले आहेत. सध्या ते अमेरिकेमध्ये शास्त्रीय गायनाचे धडे विद्यार्थ्यांना देत आहेत.
महेश काळे यांना मिळालेले पुरस्कार
'कट्यार काळजात घुसली' या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार*माझा सन्मान पुरस्कार 2016* प्रवाह रत्न पुरस्कार - 2016*संस्कृती कलादर्पण पुरस्कार- 2016• माणिक वर्मा पुरस्कार 2016* रेडिओ मिर्धा म्युझिक पुरस्कार- 2016*झी सिने गौरव पुरस्कार ज्यूरी अवार्ड 2016• आय सी सी इन्स्पायर पुरस्कार ऑफ इंडिया काम्यूनिटी सेंटर सॅन फ्रेन्सिको व एरिया 2019