Mahesh Kothare : मराठी सिनेसृष्टीतील सासरे आणि सुनेची लोकप्रिय जोडी म्हणजे महेश कोठारे आणि त्यांची सून उर्मिला कोठारे (Urmila Kothare). महेश कोठारे म्हणजे दिग्दर्शन क्षेत्रातील प्रसिद्ध नाव. ९० च्या दशकात त्यांच्या सिनेमांनी प्रेक्षकांना वेड लावलं होतं. तसेच त्यांची 'डॅम इट' म्हणण्याची स्टाईल आजही लोकप्रिय आहे.
महेश कोठारे यांचा जीवनप्रवास सांगणाऱ्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या कार्यक्रमात त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि सून ऊर्मिला कोठारे यांनी सूत्रसंचालन केले. डॅम इट आणि बरंच काही असं पुस्तकाचं नाव आहे. उर्मिला आणि महेश कोठारे यांचं नातं बाप लेकी सारखंच आहे. ऊर्मिलाने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत महेश कोठारेंचा एक चांगला गुण सांगितला आहे. ती म्हणाली, 'त्यांच्यात एक चांगला गुण आहे जो सर्वांनीच बघितला असेल. तो म्हणचे त्यांची एनर्जी, उत्साह. ते सेटवर आले की एक वेगळीच ऊर्जा येते. ते आले की वातावरणच बदलून जातं. खेळीमेळीचं वातावरण तयार होतं. त्यांचा हा गुण खूप महत्वाचा आहे.'
ऊर्मिला पुढे म्हणाली, 'त्यांच्याबाबत आणखी एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे कोणतेही संकट आले तरी त्यांना संकटावर अगदी सराईतपणे हसता येतं. त्यांच्या याच स्वभावामुळेच ते इतके यशस्वी झाले आहेत. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.'
महेश कोठारे वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचे जनक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार
महेश कोठारे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री उर्मिला कोठारे, पुस्तकाचे संपादक मंदार जोशी, बँक ऑफ महाराष्ट्रचे आशिष पांडे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे अखिल मेहता. प्रकाशन सोहळ्याला किरण शांताराम, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, निवेदिता सराफ, मच्छिंद्र चाटे, जयवंत वाडकर, रामदास पाध्ये, उमेश जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.