Join us

आपल्या माणसांवर दोन ओळी लिहायला तुमच्याकडे वेळ नाही का? महेश टिळेकर यांचे ‘नाटकी’ सेलिब्रिटींना झणझणीत सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 1:43 PM

दिग्गज दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर यांनी मराठी सेलिब्रिटींच्या या ‘लॉकडाऊन पोस्ट’वर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

ठळक मुद्देमहेश टिळेकर हे दिग्दर्शक, निर्माते आहेत़ ‘मराठी तारका’ हा त्यांचा शो चांगलाच लोकप्रिय आहे.

लॉकडाऊनच्या काळात सेलिब्रिटी कधी नव्हे इतके सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. बॉलिवूडच नव्हे तर मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीही घरकामापासून तर स्वयंपाकापर्यंतचे व्हिडीओ, फोटो शेअर करत आहेत. सेलिब्रिटींच्या या पोस्टने चाहत्यांचे मनोरंजन झाले असेलही. पण आता मराठीचे दिग्गज दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर यांनी मराठी सेलिब्रिटींच्या या ‘लॉकडाऊन पोस्ट’वर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. मस्त चाललंय आमचं, असे शीर्षक असलेली त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. लॉकडाऊनच्या काळात मराठी स्टार्स नाही ते व्हिडीओ टाकत आहेत.   अशोक सराफ यांचा वाढदिवस झाला, मध्ये विजू खोटे गेलेत, सुलोचना दीदींचा वाढदिवस होता. पण काही बोटावर मोजण्या इतक्यांचा अपवाद सोडला तर अन्य कोणत्याही स्टार्सला त्यांच्यावर साधा एक शब्दही लिहावासा वाटला नाही, अशा शब्दांत त्यांनी मराठी सेलिब्रिटींच्या ‘लॉकडाऊन पोस्ट’चा खरपूस समाचार घेतला आहे.

हिंदीतील मोठ्या हिरोचा वाढदिवस असेल तर गुगलवर फोटो शोधून तो स्वत:च्या अकाऊंटवर पोस्ट करून करून त्या हिरोबद्दल असलेला अभिमान आणि कौतुक दाखवणारी, स्वत:ला स्वयंघोषित मराठी स्टार म्हणणारी ही काही हुशार कलाकार मंडळी आपल्याच माणसाचे कौतुक करताना का कमी पडतात? असा सवाल त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे. विजू खोटे यांचे निधन झाले तेव्हाही मी ह्या काही नाटकी कलाकारांचा अनुभच घेतला आहे, असेही त्यांनी लिहिले आहे.महेश टिळेकर हे दिग्दर्शक, निर्माते आहेत़ ‘मराठी तारका’ हा त्यांचा शो चांगलाच लोकप्रिय आहे.

टॅग्स :अशोक सराफविजू खोटे