‘हिला नको गाऊ द्या’ अशा आशयाची पोस्ट टाकून अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्यावर टीका करणारे दिग्दर्शक महेश टिळेकर यानंतर चांगलेच ट्रोल झाले. या ट्रोल करणा-यांना महेश टिळेकर यांनी आता खरपूस शब्दांत उत्तर दिले आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांनी ‘भक्तांना’ लक्ष्य केले. मी जे काही त्या गायिकेच्या आवाजावर टीका करण्याची करण्याची हिम्मत केली त्या मागे चंद्रकांत पाटील यांचा हात आणि पाठिंबा आहे असाही अर्थ आता हे भक्त काढतील का हे फोटो पाहून? असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.अमृता फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर महेश टिळेकर व अभिनेता आरोह वेलणकर यांच्यात जुंपली होती. टिळेकर यांनी आरोह वेलणकर यालाही उत्तर दिले आहे. प्रसिद्धीसाठी हपापलेला नट, अशा शब्दांत त्यांनी आरोहवर निशाणा साधला.
काय म्हणाले महेश टिळेकर बेसूर गाणं आणि गाणा-या गायिकेचं मी कौतुक न केल्यामुळे अनेकांचे कान ठणकू लागले आहेत. त्यांना पोटदुखी पण सुरू झाली आणि त्यांचे पित्त उसळले आहे, जे मला येणा-या कमेंट्समधून समजलं. शरद पवारसाहेब आणि सुप्रियाताई यांच्यासोबतचे माझे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्या गायिकेच्या चाहत्यांनी, भक्तांनी बोंबलायला सुरुवात केली. माझ्यावर झुंडीने येऊन शिव्या देण्याचे कॉन्ट्रॅक्ट यांना त्यांच्या पक्षा कडून, नेत्यांच्या कडून देण्यात आल्याचे सिद्ध होत नाही का?हीच त्या पक्षाची विचारधारा?त्या पक्ष्यातीला कार्यकर्त्यांची अक्कल किती आहे ते त्यांनी दाखवून दिलं आहेच. मला विधान परिषदेचे आमदार होण्याची भूक आहे म्हणून त्या गायिके वर मी टीका केली अश्याही कमेंट्स आल्यात.जे वाचून हसायला आले. आता या फोटोत भक्तांचे लाडके नेते चंद्रकांत पाटील माझ्यासोबत आहेत. म्हणजे मी जे काही त्या गायिकेच्या आवाजावर टीका करण्याची हिम्मत केली त्या मागे चंद्रकांत पाटील यांचा हात आणि पाठींबा आहे असाही अर्थ आता हे भक्त काढतील का हे फोटो पाहून?, असे महेश टीळेकर यांनी लिहिले आहे. काहीही झालं तरी गायिकेवर लिहिलेली पोस्ट मी डिलीट करणार नाहीच, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
आरोहला दिले उत्तरआरोह वेलणकर सारखा नट (?) चवताळून माझ्यावर टीका करायला पुढं आला. आरोहला स्वत:च्या अभिनयाची (असेल तर) काळजी नाही पण त्याला गाण्याबद्दल जाणही नाही. त्याने बिग बॉस नंतर चर्चेत राहण्यासाठी त्याने संधी साधून प्रसिद्धी मिळवून घेतली. तर असा हा प्रसिद्धीसाठी हपापलेला नट आरोह त्याला त्याची लायकी दाखवली, अशा शब्दांत त्यांनी आरोह वेलणकर याला उत्तर दिले आहे.
तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथे?; महेश टिळेकर - आरोह वेलणकरमध्ये शाब्दिक बाचाबाची