मोजक्याच तरीही लक्षवेधी भूमिका करत रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर अभिनेता मकरंद देशपांडे ( Makrand Deshpande) यांनी आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे. त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सध्या ते 'अल्याड पल्याड' (Alyad Palyad Movie) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचं सध्या मकरंद देशपांडे प्रमोशन करत आहे. अशातच मकरंद यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी राजकारणावर भाष्य केलं. सोबतच त्यांनी त्याच्या आवडत्या नेत्याचाही खुलासा केला.
राजकारणाबद्दल मकरंद देशपांडे म्हणाले, राजकारण हा माझा पिंड नाही. पण, महाराष्ट्रात असे काही नेते आहेत. ज्यांना बोलताना ऐकावं वाटतं. जेव्हा बाळासाहेब ठाकरे बोलायचे, तेव्हा त्यांच्या मताशी तुम्ही सहमत असो किंवा नसो त्यांचं भाषण ऐकावं वाटायचं. ऐवढी ताकद त्यांच्यात होती. अलीकडे राज ठाकरेंनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत. त्यातील अर्थपुर्ण प्रश्न आणि सविस्तर उत्तरे, ज्यातून इतिहास, राजकारण तुम्हाला समजतंय. एक व्यवस्था तुमच्यासमोर मांडली जातेय, असं काही अभ्यासू वृत्ती असलेल्यांनाही हे ऐकायला आवडतं'.
मुलाखतीमध्ये बोलताना मकरंद देशपांडे यांनी त्यांचे आवडते नेते हे राज ठाकरे असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, 'मला राज ठाकरे हे कायम आवडत आले आहेत. ते एक शक्तीशाली नेते आहेत. यासोबत इतरही काही नेते आहेत, ज्यांचं बोलणं ऐकावं वाटतं. जसं नितिन गडकरी आहेत. शिवाय, राजकारणात नम्रता, सद्सदविवेक बुद्धी हवी, असे ते म्हणाले.
दरम्यान, मकरंद देशपांडे यांनी 'अल्याड पल्याड' सिनेमात तंत्र-मंत्र यात पारंगत असलेल्या एका सिद्धयोगी साधूची भूमिका साकारली आहे. मकरंद यांनी हिंदीसह अनेक मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर मकरंद देशपांडे हे निवेदिता पोहनकर (Nivedita Pohankar)सोबत सात वर्षे लिव्ह इन रिलेशनववरून चर्चेत राहिले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. निवेदिता पोहनकर ही लेखिका म्हणून ओळखली जाते. पृथ्वी थिएटर्सची काही नाटके तिने लिहिली आहेत. रंगभूमीवर काम करत असतानाचा निवेदिता आणि मकरंद यांची भेट झाल्याचे म्हटले जाते.