Join us  

मकरंद अनासपुरे यांची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, दोघांनी केलंय 'या' ५ चित्रपटांमध्ये काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 5:37 PM

फार कमी लोकांना माहित आहे की, मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांची पत्नी शिल्पा अनासपुरे देखील अभिनेत्री आहेत.

मराठमोळा अभिनेता मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी हिंदी चित्रपटातही काम केले आहे. वास्तव, वजुद, यशवंत, प्राण जाये पर शान ना जाये, माय फ्रेंड गणेश या चित्रपटातदेखील काम केले आहे. ‘डॅम्बीस’ या चित्रपटाचे पटकथालेखन, दिग्दर्शन व निर्मिती देखील त्यांनी केली आहे. बऱ्याच लोकांना माहित नाही की मकरंद अनासपुरे यांची पत्नी शिल्पा अनासपुरे देखीलअभिनेत्री आहेत. मात्र सध्या त्या सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे.

मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचे लव्ह मॅरिज झाले आहे. शिल्पा मुळच्या मुंबईच्या असून त्यांनी नाटक आणि चित्रपटातून काम केले आहेत. २००० साली 'जाऊ बाई जोरात' या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पा आणि मकरंद यांची भेट झाली होती. याचकाळात मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या होत्या आणि त्यांनी शिल्पा यांना लग्नाची मागणी घातली. 

शिल्पा यांनी होकार दिल्यानंतर दोघांनी त्यांच्या घरी याबद्दल सांगितले. विशेष म्हणजे दोघांचे हे इंटरकास्ट मॅरेज आहे. पण दोन्ही घरातून अजिबात विरोध झाला नाही. ३० नोव्हेंबर २००१ रोजी औरंगाबादमध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर शिल्पा यांनी काही चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्यासोबत चित्रपटात काम केले. एक दोन नव्हे तर तब्बल ५ चित्रपटात ते एकत्र झळकले आहेत. कापूस कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, सुंबरान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केली आहेत.

मकरंद आणि नाना पाटेकर चालवत असलेल्या नाम फाउंडेशनच्या कार्यातदेखील शिल्पा यांचादेखील मोलाचा वाटा आहे. मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

टॅग्स :मकरंद अनासपुरे