Join us

Manasi Naik : मानसी नाईकनं वाढदिवसादिवशी केली मोठी घोषणा, म्हणाली - 'बरीच वर्षे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 14:06 IST

Manasi Naik : मानसी नाईक हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोठी घोषणा केली आहे.

अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) हिचा आज वाढदिवस असून या दिवशी तिने मोठी घोषणा केली आहे. आता ती एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. मानसी एका हिंदी वेब फिल्ममध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर आजच्या खास दिवशी रिलीज करण्यात आले आहे. पी ए एन्टरटेन्मेंट निर्मित या चित्रपटाचं नाव सिफर असं आहे. या चित्रपटामध्ये मानसी एका महत्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या भूमिकेबद्दल मानसी सांगते, सिफरचा अर्थ शून्य असा आहे, एका अनाथ मुलीचा प्रवास यातून दाखवण्यात आला आहे. याला सिफर का म्हटले आहे, ते ही चित्रपट पाहूनच लक्षात येईल. वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. या भूमिकेचे खूप टप्पे आहेत मानसीला खूप दिवसांनी अशी भूमिका मिळाली आहे. 

मानसी याबद्दल म्हणते की,  मला ही भूमिका मिळायला बरीच वर्षे वाट पाहायला लागली. गेली अनेक वर्षे डान्सर म्हणून लोकांनी जास्त ओळखलं आहे. पण या भूमिकेमुळे वेगळी मानसी दिसून येईल. मानसीच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

चैतन्य आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेली या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद वैद्य यांनी केले आहे. तर धनंजय कुलकर्णी याचे डीओपी आहे. या फिल्ममध्ये हिंदीतील नामवंत कलाकार आहेत, या बद्दल लवकरच खुलासा होणार आहे.

टॅग्स :मानसी नाईक