प्रसाद ओक (Prasad oak) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. दर्जेदार अभिनयामुळे ओळखला जाणार प्रसाद सध्या त्याच्या उत्तम दिग्दर्शकीय कौशल्यामुळे चर्चेत येत आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी ओक (manjiri oak) दोघंही सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे अनेकदा दोघांचे रिल्सही सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. मंजिरीने नुकताच प्रसादसोबतच्या रिलवर कमेंट केलीय जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रसाद ओकने सोशल मीडियावर रिल शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये प्रसाद म्हणतोय, फार्दस डे, मर्दस डे, चिल्ड्रन्स डे, पेरेंट्स डे, टिर्चस हे डे जसे असतात ना तसेच मतलबी डे, अपलपोटी डे आणि स्वार्थी डे असे डे यायला हवेत लई लोकांना विश करता येईल असे म्हणताना दिसतोय. पटतंय की नाही?? असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
प्रसादचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही कमेंट केल्या आहेत. हो पाहिजेत!या प्रकारचे days खूप जणांना wish ही करत येईल आणि आपल्याला कोण कोणत्या category साठी wish करतंय हे ही माहीत पडेल, बरोबर आहे दादा पण, खरं आहे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण मंजिरी ओकच्या कमेंट सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण मी काय म्हणते, नकोच ते विष असं लिहित सोबत एक हसणारी इमोजी पोस्ट केली आहे.
अभिनेता प्रसाद ओक हा मराठी इंडस्ट्रीतला सुप्रसिद्ध अभिनेता आहे. अनेक सिनेमे आणि मालिका करत त्याने प्रेक्षकांच्या मन स्वत:चं स्थान निर्माण केलयं. सध्या तो महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये जजची धुरा संभाळतो आहे.