Join us  

मानसी नाईकने दिली Good News!, बेबी बंपचा फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 11:48 AM

मानसी नाईकने सोशल मीडियावर बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री मानसी नाईक वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते तर कधी नवऱ्यासोबतच्या व्हिडीओमुळे. आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मानसी नाईक लवकरच गुड न्यूज देणार आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

अभिनेत्री मानसी नाईक हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आणि लिहिले, लवकरच. या फोटोत तिने साडी नेसली असून हातात तिच्या चॉकलेट दिसते आहे. तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

मात्र वास्तविकतेत मानसी नाईक प्रेग्नेंट नसून हे तिने आगामी प्रोजेक्टसाठी केले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिचा हा फोटो काही लोकांना पटत नाही आहे. त्यामुळे मानसीचे चाहते तिच्या या पोस्टवर निगेटिव्ह कमेंटही करत आहेत. एका युजरने म्हटले की खूप जास्त प्रगती झाली. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, आरे आता हे कधी एवढे झाले लगेच. तर आणखी एका युजरने लिहिले नकली पोट. त्यामुळे या फोटो मागचे खरे कारण मानसी नाईक कधी सांगते, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

मानसी व प्रदीप बऱ्याच कालावधीपासून एकमेकांना डेट करत होते. शेवटी यावर्षी १९ जानेवारीला मानसी व प्रदीप लग्नबंधनात अडकले. मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे.

बऱ्याचदा ते दोघे सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. तसेच ते रिल व्हिडीओ करताना दिसतात आणि त्यांच्या व्हिडीओंना चाहत्यांची पसंतीदेखील मिळते. 

टॅग्स :मानसी नाईक