Join us

शरद केळकर, समीर धर्माधिकारी, स्पृहा जोशी असे बरेच मराठी चेहरे झळकले ओटीटीच्या मंचावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 17:19 IST

शरद केळकर, स्पृहा जोशी, समीर धर्माधिकारी हरीश दुधाडे, आधीश पायगुडे असे बरेच मराठी कलाकार डिजिटल माध्यमात दिसले आहेत.

2020 हे वर्ष, ओटीटीसाठी चांगले वर्ष ठरले असून या वर्षी ओटीटीवर तयार होत असलेल्या ओरिजिनल कंटेंटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि यासोबतच, अनेक प्रादेशिक कलाकारांना चित्रपट आणि वेब सिरी च्या निमित्ताने महत्त्वाचे व्यासपीठ सापडले आहे. ओरिजिनल कंटेंटच्या बाबतीत झी5 ने सर्वोच्च स्थान मिळवले असून त्याद्वारे, बर्‍याच कलाकारांना त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. शरद केळकर, स्पृहा जोशी, समीर धर्माधिकारी हरीश दुधाडे, आधीश पायगुडे असे अनेक मराठी चेहेरे झी5 वर चित्रपट आणि वेबसिरीजच्या माध्यमातून झळकले आहे. 

नुकत्याच प्रदर्शित होत असलेल्या झी5 वरील कोर्ट रूम ड्रामा 'नेल पॉलिश' मध्ये समीर धर्माधिकारी आणि आधीश पायगुडे दिसणार आहेत. समीर आपल्या कामासाठी हिंदी मराठीत प्रसिद्ध आहेत तर ‘रात्रीस खेळ चाले-२’ मधून घराघरात पोहोचलेले ‘पाटणकर’ ही व्यक्तीरेखा साकारणारा गुणी कलाकार अधीश पायगुडे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. समीर धर्माधिकारी आणि आधीश हे दोन्ही कलाकार मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत चांगलेच ओळखले जातात आणि अर्जुन रामपाल, मानव कौल, आनंद तिवारी आणि रजित कपूर यासारख्या प्रतिभावान अभिनेत्यांसह यावेळी दिसणार आहेत.

शरद केळकर हे नाव हिंदी मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहे. यावर्षी झी5 वर त्याचे दोन सिनेमे प्रसिद्ध झाले आहेत. ‘दरबान - अ स्लाईस ऑफ लाइफ’ आणि ‘ब्लॅक विडो’. शरद केळकर ओटीटीबरोबर प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत झपाट्याने वाढ केली आहे. दरबान - अ स्लाईस ऑफ लाइफ चित्रपटामध्ये शरीब हाश्मी आणि रसिका दुग्गल मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला केवळ समीक्षकच नव्हे तर प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला. शरदची सर्वात अलीकडील प्रदर्शित झालेली ‘ब्लॅक विडो’ - त्याच नावाच्या जगप्रसिद्ध मालिकेचे अधिकृत रूपांतर असून प्रेक्षकांनी या मालिकेला आणि शरदच्या भूमिकेला पसंतीची पावती दिली आहे. 

या सर्वांबरोबरच मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील महत्त्वाचे नाव म्हणजे स्पृहा जोशी. स्पृहा जोशी हिने झी 5 ची सर्वात लोकप्रिय मालिका ‘रंगबाज’च्या सीक्वेल मधून ओटीटी पदार्पण केले असून ‘रंगबाज फिरसे’ मधून तिने जिमी शेरगिल, साकीब सलीम आणि गुलपनाग सोबत काम केले आहे.

तसेच, झी5 वरील गाजलेल्या नक्षलबारी मधून मराठी अभिनेता हरीश दुधाडे झळकला आहे. हरीशने राजीव खंडेलवाल, आमिर अली यांच्यासोबत यामध्ये काम केले आहे.

टॅग्स :शरद केळकरस्पृहा जोशीसमीर धर्माधिकारी