स्त्री भूमिकेत कोण आहे हा मराठमोळा अभिनेता?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2017 11:02 AM
बालगंधर्वपासून अनेक पुरुष कलाकारांनी आजवर स्त्री व्यक्तीरेखा साकारल्या आहेत.पुरुष असताना एखाद्या महिलेचं पात्र साकारणं, महिलेसारखं वागणं, हावभाव, कपडे परिधान ...
बालगंधर्वपासून अनेक पुरुष कलाकारांनी आजवर स्त्री व्यक्तीरेखा साकारल्या आहेत.पुरुष असताना एखाद्या महिलेचं पात्र साकारणं, महिलेसारखं वागणं, हावभाव, कपडे परिधान करणं सारं काही आव्हानात्मक... यापूर्वीही मालिका किंवा सिनेमांमध्ये भूमिकेसाठी काही पुरुष कलाकारांनी स्त्री पात्र लीलया साकारली आहेत.आता असाच काहीसा प्रयोग अभिनेता सुयश टिळकनेही केला आहे.व्हायरस मराठीच्या आगामी गेट टूगेदर व्हिडीओमध्ये अभिनेता सुयश टिळकने स्त्री पात्र साकारलं आहे. स्त्रीची लकब, हावभाव सांभाळणं... मुळात स्त्री रुप साकारणं आपल्यासाठी आव्हानात्मक असल्याचे सुयश टिळकने म्हटले आहे.सध्या सुयशचा स्त्रीवेशातला हा फोटो सोशल मीडियावर आकर्षणाचा विषय ठरतोय.या वेबसिरीजमध्ये सुयश टिळकसह समीर पाटील यांनी जादुगार, शर्मिला शिंदेने भिकारी,छाया कदमने पुरुष,रिचा अग्निहोत्रीने चेटकीण, अक्षय शिंपी याने वेडा, तर चैतन्य सरदेशपांडे याने गोवन तरुण असे पात्र साकारलेले आहेत.'ऑसम टूसम' हा ट्रॅव्हल शो आणि 'शॉक कथा' या दोन मालिका सध्या व्हायरस मराठीवर दिसत आहेत.व्हायरस मराठीच्या व्हिडीओज ना यू ट्यूबवर उत्तम प्रतिसाद मिळत असून तरूणाईकडून चांगली पसंती मिळते आहे.श्रीधर चिटणीस आणि संतोष कोल्हे हे या व्हिडीओजची निर्मिती करत आहेत.व्हायरस मराठीच्या आगामी गेट टूगेदर व्हिडीओ मध्ये अभिनेता सुयश टिळकनं स्त्री पात्र साकारतान झळकणार आहे.गेट टू गेदरसाठी जमलेल्या व्हायरस मराठीच्या सर्व सात अभिनेत्यांना दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी सात भूमिका सादर करण्याचं आवाहन दिलं होतं त्यात सुयशनं तरुण घरंदाज स्त्रीचं रूप घेऊन छान सादरीकारण केलं आहे.