Join us

या मराठमोळ्या अभिनेत्रीला गवसली नवीन मैत्रीण,शूटिंगच्या सेटवर अशी करतात मौजमस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 8:33 AM

माधुरी तिच्या या आगामी चित्रपटासाठी सध्या चांगलीच मेहनत घेत आहे.या चित्रपटात ती पुण्यात राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे. ...

माधुरी तिच्या या आगामी चित्रपटासाठी सध्या चांगलीच मेहनत घेत आहे.या चित्रपटात ती पुण्यात राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे. पुण्यात राहाणाऱ्या लोकांची बोलण्याची ढब ही मुंबईतील लोकांपेक्षा वेगळी असते.त्यामुळे सध्या ही बोलण्याची ढब शिकण्याचा माधुरी प्रयत्न करत आहे.एवढेच नव्हे तर या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये माधुरी आपल्याला बाईक चालवताना दिसणार आहे. त्यामुळे माधुरी सध्या बाईक चालवायला शिकत आहे. या चित्रपटासाठी माधुरी खूपच उत्सुक असल्याचे कळतेय.माधुरी दिक्षित सध्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी तर आहेच तसेच प्रचंड खुश आहे.याला खास कारण ही आहे. ते म्हणजे  रेशीम टिपणीसह माधुरीची चांगलीच गट्टी जमली आहे.शूटिंग दरम्यान ब्रेक मिळताच दोघांच्या मस्त गप्पा रंगतात आणि मस्त सेल्फी घेण्याचा आनंदही लुटताना दिसतात. Also Read:माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’चे पहिले पोस्टर आले!आतापर्यंतच्या फिल्मी करीअरमध्ये कधीच बाईक न चालवलेली माधुरी बकेट लिस्टच्या निमित्ताने पहिल्यांदाच हार्ले डेविडसन बाईकवर दिसली आहे.आपल्या आयुष्याच्या एका वळणावर ही गृहिणी थेट बाईकवर स्वार होते...यामागे नेमकं काय गोम आहे,हे चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळणारच आहे, पण यानिमित्ताने पुण्यात अवरलेल्या या अप्सरेला पाहून पुणेकर मात्र सुखावले आहेत. चित्रपटाच्या शूटींगसाठी पुण्यात अवतरलेली ही अप्सरा आपल्या आठवणींमध्ये चांगलीच रमली. याविषयी सांगताना आपल्या भावंडांबरोबर पुण्यात धमाल उडवून दिल्याचं ती म्हणाली.सुमित राघवन हा हरहुन्नरी अभिनेता बकेट लिस्टच्या निमित्ताने धकधक गर्ल माधुरीबरोबर रूपेरी पडद्यावर पाहायला  मिळणार आहे. या चित्रपटातील रोमॅंटिक गाण्याच्या शूटींगसाठी माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन तसेच बकेट लिस्टची टीम मलेशियात (लंकावी)  जाऊन पोहोचली आहे. ब्लु मस्टँग क्रिएशन्स, डार्क हॉर्स सिनेमा आणि दार मोशन पिक्चर्स निर्मित बकेट लिस्ट या सिनेमाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊसकर यांनी केलं आहे. तर चित्रपटाची कथा तेजस प्रभा विजय देऊसकर आणि देवश्री शिवाडेकर यांनी लिहिली आहे. या मलेशिया सफारी निमित्ताने सुमित राघवनच्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.