Join us

मराठमोळ्या मृण्मयी देशपांडेच्या अमेरिकेतील फोटोवर नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 2:42 PM

Mrunmayee Deshpande : मृण्मयी सध्या अमेरिकेत आहे. न्यूयॉर्कमधील टाईम्स स्केअर इथला फोटो शेअर करत, सांगा मी कुठे आहे? असं विचारलं आहे. यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्यात.

भटकंती कुणाला नाही आवडत... आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेसुद्धा सध्या परदेशात आहे. मृण्मयी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. मृण्मयी सध्या अमेरिकेत आहे.  न्यूयॉर्कमधील टाईम्स स्केअर इथला फोटो शेअर करत, सांगा मी कुठे आहे? Wrong answers only!! असं कॅप्शन तिनं दिलं आहे. मृण्मयीच्या या फोटो सेलिब्रेटींसह चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. घरात, तुळशीबागेत,अलका टॉकीज चौक, पुणे,ग्राहक पेठ !!, दादर मार्केट अशा एकापेक्षा एक कमेंट्स मृण्मयीच्या या फोटोवर आल्या आहेत. अमेरिकेतील बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनासाठी मृण्मयी तिथे गेली आहे. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा मृण्मयी देशपांडेने उमटविला आहे. 

टॅग्स :मृण्मयी देशपांडेसेलिब्रिटी