Adinath Kothare and Urmila Kothare's daughter Jizah : आदिनाथ कोठारे (Adinath Kothare ) हा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांचा लाडका अभिनेता. सोशल मीडियावरही आदिनाथ प्रचंड अॅक्टिव्ह आहे. कधी स्वत:चे फोटो तर कधी लेक जीजासोबतचे भन्नाट व्हिडीओ तो शेअर करत असतो. सध्या आदिनाथ आणि जीजाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. अनेकदा लहान मुलं असे काही प्रश्न विचारतात की, त्याचं उत्तर देणं अनेकदा पालकांना कठीण जातं. चिमुकल्या जीजाने बाबाला असाच एक प्रश्न केला आणि बाबाने असं काही उत्तर दिलं की, पाहून तुम्हीही कौतुक कराल.होय, सध्या आदिनाथ व जीजाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडीओत आदिनाथ जीजाला कारमधून शाळेत सोडायला निघालेला दिसतोय. आदिनाथ कार चालवतो आहे आणि जीजा त्याच्या बाजूला बसली आहे. अशात ‘डॅडा असं काय आहे जे मुलींना करता येत नाही?’,असा प्रश्ल जीजा करते आणि मग खरा व्हिडीओ सुरु होतो. या व्हिडीओत महिला काय काय करू शकतात, यावर अनेक लोक प्रतिक्रिया देताना दिसतात.
नंतर आदिनाथ जीजा समजावून सांगतो. मुली, महिला करू शकत नाही, असं जगात काहीही नाही. त्या सगळं काही करू शकतो. म्हणून नारीशक्तीची पूजा होते. म्हणून आपण नवरात्री सेलिब्रेट करतो, असं आदिनाथ जीजाला म्हणतो. या व्हिडीओच्या माध्यमातून आदिनाथने नारीशक्तीला सलाम केला आहे. नवरात्रोत्सवात नारीशक्तीला का पूजलं जातं? याच अगदी साध्या सोप्या भाषेत त्याने उत्तर दिलं आहे. आदिनाथ व जीजाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. किती सुंदर आणि हृदयस्पर्शी व्हिडीओ. या व्हिडीओमुळे खरंच खूप प्रेरणा मिळाली, असं एका चाहतीने लिहिलं आहे. जीजा आणि डॅडा तुम्ही खूप सुंदर गोष्ट सांगितली, तुमचे आभार, अशा आशयाच्या पोस्ट अनेकांनी केल्या आहे.