Join us

'स्टारपुत्र' असल्याचा काय होतो परिणाम? अजिंक्य देव म्हणाला, 'अभिषेक बच्चनसारखीच माझीही...'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 2:20 PM

अजिंक्य देव म्हणाले, 'सध्या फक्त दोनच 'स्टारपुत्र' यशस्वी झालेत. एक म्हणजे...

मराठी सिनेअभिनेते अजिंक्य देव (Ajinkya Deo) म्हटलं की भारदस्त आवाज, डॅशिंग व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं. अजिंक्य देवने अनेक सिनेमात काम केलं. 'माहेरची साडी' सारखा लोकप्रिय सिनेमा केला. मात्र कायम त्यांची ओळख ही रमेश देव आणि सीमा देव यांचा मुलगा अशीच होती. याचं कधी दडपण आलं का यावर अजिंक्य देवने 'लोकमत फिल्मी'शी बातचीत करताना भाष्य केलं आहे. 

'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टर या शोमध्ये अजिंक्य देवने हजेरी लावली. अभिषेक बच्चनवर जसा स्टारपुत्र असल्याचा दबाव आहे तसंच तुमच्यासोबतही झालं आहे का? तेव्हा तो म्हणाला, "१०१ टक्के झालं. हे एक शिवधनुष्य आहे जे पेलणं खूप कठीण आहे. प्रत्येकालाच पेलता येत नाही. आज जर आपण इतिहास पाहिला तर त्यातल्या त्यात चाललेले 'स्टारपुत्र' म्हणजे संजय दत्त आणि सनी देओल तो सुद्धा फार वर्षानंतर यशस्वी झाला. त्यामुळे या सगळ्याला वेळ लागतो. आमच्या डोक्यावर वडिलांचं आणि आईचं  वलय एवढं मोठं असतं की ते तोडणं खूप कठीण आहे. जे अभिषेकबद्दल होत असेल त्याची मला पूर्ण कल्पना आहे कारण ते मलाही व्हायचं आणि होतं."

तो पुढे म्हणाला,"आज आईबाबा दोघंही नाहीत त्यामुळे आता लोक माझ्याकडे केवळ अजिंक्य देव म्हणून बघणार आहेत. त्यांचे आशिर्वाद कायम बरोबर राहणार आहेत. सुरुवातीचा काळ त्या दबावाखाली नक्कीच जातो. मी ५० चित्रपट केले त्यानंतरही मला रमेश देव यांचा मुलगा अशीच हाक मारायचे. पण मला त्याचं दु:ख कधीच नाही झालं."

६० ते ७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांना अजिंक्य आणि अभिनय देव ही मुलं आहेत. 2022 साली रमेश देव यांचं निधन झालं तर काहीच महिन्यात सीमा देव यांनीही जगाचा निरोप घेतला. अजिंक्य देव यांनी 1985 साली 'अर्धांगी' या सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं. तर अभिनय देव यांनी दिग्दर्शन क्षेत्रात काम केलं. 

टॅग्स :अजिंक्य देवरमेश देवमराठी अभिनेतामराठी चित्रपट