Join us

अरे देवा! अमेय वाघने खाल्लं जास्वंदाचं फूल, व्हिडिओ शेअर करत म्हणतो- "माझ्या पोटात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 17:04 IST

अमेयने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अमेय जास्वंदाचं फूल खाताना दिसत आहे.

अमेय वाघ हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून अमेय वाघने अभिनयाचा ठसा उमटवला. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील कैवल्य या भूमिकेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. अमेय सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. 

अमेयच्या अभिनयाचेही लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावरून अमेय चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही तो चाहत्यांना देत असतो. नुकतंच अमेयने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अमेय जास्वंदाचं फूल खाताना दिसत आहे. अमेयबरोबर या व्हिडिओत एक मुलगाही दिसत आहे. तो मुलगा या अमेयला जास्वंदाचं फुल खाण्याचं महत्त्व पटवून देत आहे. 

"जास्वंदाचं फूल खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते", असं तो मुलगा अमेयला म्हणतो. त्यावर अमेय त्याला "माणूस मरत नाही ना हे फूल खाऊन", असं मजेत म्हणतो. त्यानंतर अमेय व्हिडिओत जास्वंदाचं फूल खाताना दिसत आहे. "हे फूल खाऊन मला काही झालं तर तुम्ही याला पकडा" असं अमेय नंतर मजेत म्हणताना दिसत आहे. 

"सिनेमाच्या सेटवर हे खाल्यानंतर माझं पोट 'फूल' झालं आहे", असं अमेयने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे. त्याच्या या व्हिडिओवर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी कमेंट करत "नको रे नको" असं म्हटलं आहे. 

टॅग्स :अमेय वाघमराठी अभिनेता