Join us  

Amey Wagh : ‘ह्या’ नोकरीतून मी कधीच रिटायर्ड होणार नाही..., अमेय वाघ कुणाची करतोय नोकरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 10:59 AM

Amey Wagh : अमेयच्या पोस्ट भारी असतातच शिवाय या पोस्टला त्यानी दिलेली कॅप्शन त्याहूनही भारी असतात. सध्या त्याच्या अशाच एका पोस्टची चर्चा होतेय...

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघने (Amey Wagh ) आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केलं. चित्रपट, मालिका, रंगभूमी आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप  सोडली आहे. अमेय सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. अमेयने पोस्ट टाकली रे टाकली ती व्हायरल झालीच म्हणून समजा. अमेयच्या पोस्ट भारी असतातच शिवाय या पोस्टला त्यानी दिलेली कॅप्शन त्याहूनही भारी असतात. सध्या त्याच्या अशाच एका पोस्टची चर्चा होतेय. होय, बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या (Amey Wagh Sajiri Deshpande Wedding anniversary ) शुभेच्छा देणारी अशी काही हटके पोस्ट त्याने शेअर केली की, ती सुद्धा क्षणात व्हायरल झाली.

अमेयने बायको साजिरीसोबतचा (Sajiri Deshpande) एक फोटा शेअर करत, बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. या पोस्टमध्ये त्याने बायकोला मालकीण म्हणून संबोधलं आहे आणि शिवाय या नोकरीतून मी कधीच रिटायर्ड होणार नाही, असंही म्हटलं आहे. आता नोकरीची ही काय भानगड आहे. तर ते तुम्हाला अमेयची पोस्ट वाचून कळेल.‘सौ. साजिरी देशपांडे वाघ ह्यांच्याकडे पर्सनल ड्रायव्हर, पर्सनल घरगडी, पर्सनल पंचबॅगची नोकरी मला मिळून आज पाच वर्षे झाली. पगार म्हणून वेळच्या वेळी आभाळभर प्रेम मिळत असतंच! ह्या नोकरीतून मी कधीच रिटायर्ड होणार नाही! हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी मालकीण,’ अशी कॅप्शन त्याने या पोस्टला दिली आहे.

  अमेय वाघ 2013 साली लग्नबेडीत अडकला. 13 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर त्याने साजिरी देशपांडेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमेय आणि साजिरीची लव्हस्टोरी पुण्याच्या कॉलेजमध्ये सुरु झाली होती.साजिरी अमेयच्या कॉलेजमधील नाटकाची तालीम पाहायला जायची. अमेयला पाहिल्यानंतर साजिरी त्याच्या प्रेमात पडली आणि इथून त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. अमेयची पत्नी साजिरी दिसायला खूपच सुंदर आहे. अमेय तिच्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. 

 अमेय वाघच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही त्याची मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.  मुरांबा, फास्टर फेणे, धुरळा, झोंबिवली यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं देखील कौतुक झाले होते.  

टॅग्स :अमेय वाघ