Join us

अभिमानास्पद! भरत जाधवने शेतात उभारलं आई-वडिलांचं स्मारक; फोटो पाहून तुमच्याही डोळ्यात तरळेल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 3:27 PM

Bharat jadhav आतापर्यंत आपल्या आई-वडिलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या भरत जाधवने एक कौतुकास्पद काम केल्याचं समोर आलं आहे.

भरत जाधव (bharat jadhav) हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन नाही.  चित्रपट, मालिका, नाटक अशा विविध माध्यमातून त्याने अवितरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. विशेष म्हणजे कलविश्वातील हा गुणी अभिनेता एक कलाकार असण्यासोबतच खऱ्या आयुष्यात एक चांगला मुलगादेखील आहे. आतापर्यंत आपल्या आई-वडिलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या भरत जाधवने एक कौतुकास्पद काम केल्याचं समोर आलं आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाण राखत भरतने चक्क आई-वडिलांचं स्मारक उभारलं आहे.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर (mahesh tilekar) यांच्या मराठी तारका या फेसबुक पेजवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये भरत जाधवने त्याच्या कोल्हापुरात असलेल्या शेतामध्ये आई-वडिलांचं स्मारक उभारलं आहे.

‘पुत्र असावा तर असा’…असं कॅप्शन देत टिळेकरांच्या  मराठी तारका  या फेसबुक पेजवर स्मारकाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. सोबतच भरत जाधवचा त्याच्या आई-वडिलांसोबतचाही एक फोटो यात आहे. विशेष म्हणजे आपल्या आई-वडिलांची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी भरतने कष्ट केले आहेत. टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या वडिलांनी इतकी वर्ष प्रवाशांची सेवा केली. मात्र, त्यांची सेवा करायची संधी मिळावी म्हणून भरत जाधवने खास गाडी खरेदी केली. इतकंच नाही तर नवीन घर बांधल्यानंतर आई-वडिलांना विमानात बसून नव्या घरी नेलं होतं.

दरम्यान, भरत जाधव मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने  जत्रा, वन रूम किचन, पछाडलेला, खबरदार, बकुळा नामदेव घोटाळे, हसा चकट फु, सही रे सरी अशा किती नाटक, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ऑल द बेस्ट या नाटकाच्या भरघोस यशानंतर भरत खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. 

टॅग्स :भरत जाधवसेलिब्रिटीसिनेमा