Join us  

लता मंगेशकर यांच्यासोबत झळकलेल्या 'या' फोटोमध्ये आहेत मराठी कलाकार; तुम्ही किती जणांना ओळखलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 7:30 AM

Bharat jadhav: भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्रामवर लता दीदींसोबतच एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये लता दीदींसोबत काही मराठी कलाकारही झळकले आहेत.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar) यांनी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यवर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे संपूर्ण देशावर सध्या शोककळा पसरली आहे. यात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे. यात अभिनेता भरत जाधव (bharat jadhav)यानेही लता दीदींना आदरांजली अर्पण करत एक जुना फोटो शेअर केला आहे.

भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्रामवर लता दीदींसोबतच एक जुना फोटो शेअर केला आहे. सोबतच पु.ल. देशपांडे यांचं एक वाक्यही कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. "पु.ल. एकदा आपल्या एका भाषणात म्हणाले होते की, या आकाशात सूर्य आहे.. चंद्र आहे.. आणि लता चा स्वर आहे..!!दीदी तुम्ही.. तुमचा आवाज..आणि तुमच्या स्मृती अमर आहेत..!'', असं कॅप्शन भरत जाधवने दिलं. विशेष म्हणजे या पोस्टवर अनेकांनी लता दीदींना आदरांजली वाहिली. पण, त्याचसोबत या फोटोत भरत आणि लता दीदींसोबत कोणकोणते मराठी कलाकार झळकले आहेत याचीही चर्चा सुरु झाली.

या फोटोतील मराठी कलाकारांना ओळखलं का?

भरत जाधवने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत मराठी कलाविश्वातील काही दिग्गज कलाकार झळकले आहेत. यात काही अभिनेता आहेत. तर, काही दिग्दर्शक. त्यामुळे या फोटोविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. भरत जाधवने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या आणि लता दीदींसोबत दिग्दर्शक महेश मांजरेकर, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर ही दिग्गज कलाकार मंडळी झळकली आहेत.

टॅग्स :भरत जाधवलता मंगेशकरसिनेमासेलिब्रिटीअंकुश चौधरीमहेश मांजरेकर