Join us  

आठवड्यातून पाच दिवस दोन तास सचिन पिळगावकर करतात 'ही' गोष्ट, सांगितला फिटनेस फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 4:41 PM

सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या फिटनेसचा मंत्रा सर्वांना सांगितलाय. जो फॉलो करणं आपल्याला कठीण नाहीय (sachin pilgaonkar)

सचिन पिळगावकर हे मराठीतले सुपरहिट अभिनेते-दिग्दर्शक. सचिन यांनी दिग्दर्शित केलेले 'अशी ही बनवाबनवी', 'आत्मविश्वास' हे सिनेमे चांगलेच गाजले. आजही सचिन पिळगावकर यांचे सिनेमे टीव्हीवर आवडीने पाहिले जातात. सचिन पिळगावकर सध्या त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने सचिन यांनी एका मुलाखतीत ते फिटनेससाठी काय करतात याचा उलगडा केलाय.

सचिन पिळगावकरांचा फिटनेस फंडा

सचिन पिळगावकरांनी focusedindian ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या फिटनेसचं सीक्रेट सांगितलं. सचिन पिळगावकर यांनी सांगितलं की, ते आठवड्यातून पाच दिवस रोज दोन तास बॅडिमिंटन खेळतात. त्यांच्यासमोर बॅडमिंटन खेळणारा मुलगा हा १८ वर्षांच्या खाली किंवा १८ वर्षांपर्यंतचा असतो. यामुळे सचिन यांचा कार्डीओ होतो, असं ते म्हणतात. इतर कोणताही खेळ न खेळता आठवड्यात पाच दिवस बॅडमिंटन खेळून सचिन फिट अँड फाईन आहेत. 

सचिन पिळगावकरांचंं वर्कफ्रंट

सचिन पिळगावकरांनी यांनी आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केलाय. 'शोले', 'नदीया के पार', 'सत्ते पे सत्ता' अशा हिंदी सिनेमांमध्ये सचिन यांनी दिग्गजांसोबत अभिनय केलाय. सचिन यांचे 'अशी ही बनवाबनवी', 'नवरा माझा नवसाचा', 'आयडियाची कल्पना', 'आत्मविश्वास' हे हिंदी सिनेमेही चांगलेच गाजले. सचिन यांचा २० सप्टेंबरला 'नवरा माझा नवसाचा २' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :सचिन पिळगांवकरअशोक सराफटेलिव्हिजनमराठी चित्रपट