Join us

"...तर मला काम नका देऊ, फरक पडत नाही", फॉलोवर्स बघून काम देण्याबाबत गिरीश कुलकर्णींचं रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 11:53 IST

गिरीश कुलकर्णी यांनी एका मुलाखतीत फॉलोअर्स बघून काम मिळतं या गोष्टीवर मौन सोडलं (girish kulkarni)

अभिनेते गिरीश कुलकर्णी (girish kulkarni) हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. गेल्या काही वर्षांपासून गिरीश यांनी हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीत अभिनय केलाय. गिरीश कुलकर्णी यांचे 'वळू', 'देऊळ', 'गाभ्रीचा पाऊस', 'मसाला' हे सर्व सिनेमे लोकांना चांगलेच आवडले. सध्या इंडस्ट्रीत फॉलोअर्स बघून एखाद्या नटाला सिनेमात कास्ट करण्याचे प्रकार कानावर पडतात. याविषयी गिरीश कुलकर्णी यांनी त्यांचं रोखठोक मत मांडलंय. "मी सोशल मीडियावर सक्रीय नाही तर मला काम देऊ नका", असं गिरीश कुलकर्णी म्हणाले.

मित्र म्हणे या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत गिरीश कुलकर्णी म्हणाले की, "कास्टिंग डिरेक्टर वगैरे सोशल मीडियावर काहीतरी अॅक्टीव्हिटी करायला सांगतात. त्यांनाही उत्खनन केल्यावर माझे दोन सोशल मिडिया अकाऊंट्स सापडतात. कधीच्या काळी सिनेमे करताना असेच जे मित्र मीडियाच्या व्यवहारात होते तेव्हा त्यांनीच ते अकाऊंट ओपन केले होते. काही दिवस तेच ऑपरेट करत होते. सोशल मिडिया सांभाळायची माझ्यात ऊर्जाच नाही. त्यामुळे मी असं काही केलं नाही. त्यामुळे जेव्हा मला सांगण्यात आलं की, तुम्ही काहीतरी करा नाहीतर तुम्हाला सिनेमात रोल मिळणार नाही." 

"सिनेमात काम मिळण्यासाछी फॉलोअर्स लागतात, असं मला सांगण्यात आलं. यावर शांतपणे विचार करुन मी त्यांना सांगितलं की, खेळाचा हा तुमचा नियम आहे तर या खेळात मी नाही. मला काम नाही मिळणार असंच म्हणणं आहे ना तुमचं. नका देऊ. आय डोन्ट केअर. नका देऊ कामं. रोजीरोटी कमवायची आहे, चरितार्थ चालवायचा आहे तर माझं मी बघेन. मी ती जबाबदारी घेईन. असं म्हटल्यावर समोरचा म्हणतो ऐसा कैसा चलेगा सर. मी मग त्याला सांगतो, जो है वो है. मेरो को नही आता सोशल मिडिया क्या करेंगे. तरीही शेवटी कामं करतोय मी. दक्षिणेत जाऊन करतोय, मल्याळम करतो. मोजकीच कामं करतो, थोडंच करतो. पुरेसं होतं." 

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटमराठी