एकीकडे कोरोना संकट आणि दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप असे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसतेय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सतत जनतेशी संवाद साधत आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना राज्य सरकार खंबीरपणे या संकटाचा सामना करत आहेत. अशात काल 14 एप्रिलला वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मजुरांची गर्दी झाली आणि सगळीकडे खळबळ माजली. पोलिसांनी काही तासांत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पण यानिमित्ताने पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाले. अशात मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिलेली एक पोस्ट तुफान व्हायरल होते आहे.उद्धवा... माझ्या राजा... बाळासाहेबांच्या बछड्या..तू लढ...आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असे किरण माने यांनी आपल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे.काही दिवसांपूर्वी याच किरण मानेंनी उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागितली होती. सॉरी, उद्धवजी मला तुमची माफी मागायचीय, असे त्यांनी लिहिले होते.
होय, उद्धव ठाकरे पूर्वीच्या सरकारमध्ये असताना किरण माने यांनी त्यांच्यावर अनेकदा तोंडसुख घेतले होते. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने जे ज्या पद्धतीने कोरोनाचे संकट हाताळत आहेत, ते पाहिल्यावर आधीच्या या सर्व टीकेबद्दल उद्धव ठाकरे यांची क्षमायाचना केली होती. आता उद्धव ठाकरेंवर आरोप प्रत्यारोप होत असताना किरण माने यांनी पुन्हा एक पोस्ट लिहून मी तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही दिली आहे,
उद्धवा...सतत सांगतोस,...‘मला या संकटप्रसंगी राजकारण नकोय’ तरीही काही नतद्रष्टांनी,तुझ्याविरोधात छुपी मोहीम सुरू केलीय.खरंतर तू म्हणालास तसं,‘राजकारण खेळायला आयुष्य पडलंय’पण मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमातहे ऐकणार नाही !
तू लढत रहा वाघा.. आमचा तुझ्यावर विश्वास आहे !
तू आमच्या हतबलतेचा फायदा घेऊनकृतज्ञतेच्या नांवाखालीरस्त्यावर आणून भरकटवलं नाहीस !...या अत्यंत भयावह परीस्थितीमध्येआमच्या मनातल्या भितीला ‘हेरून’आम्हाला पोकळ एकतेचं गाजर दाखवूनएकमेकांत ‘आग’ लावण्याचं राजकारण खेळला नाहीस !!
महाभयंकर विषाणूनं जगभर थैमान घातलेलं असताना..प्रत्येकानं घरात शांत बसून, सोशल डिस्टन्स ठेवून,आपला जीव वाचवण्याची गरज असताना...हिंस्त्र गिधाडासारखं ‘रस्त्यावर या..गच्चीत या..’असं क्रूर आवाहन-आव्हान काहीच केलं नाहीस.
‘तुम्ही खबरदारी घ्या... मी जबाबदारी घेतो !’हे वाक्य तू ‘आतून’ - मनाच्या तळातून - उद्गारलंस...आणि आमच्या डोळ्यांत पाणी तरळलं..तू फक्त दिलासा दे.. आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत !तू तुझी जबाबदारी पार पाड..आम्ही खबरदारीसाठी वचनबद्ध आहोत !!
उद्धवा... माझ्या राजा... बाळासाहेबांच्या बछड्या..तू लढ...आम्ही तुझ्या पाठीशी आहोत !!!
- किरण माने.