छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (chala hawa yeu dya) या कार्यक्रमातील लोकप्रिय अभिनेता, विनोदवीर म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike). कलाविश्वात सक्रीय असलेला कुशल सोशल मीडियावरही सक्रीय असून तो वरचेवर नवनवीन पोस्ट शेअर करत असतो. कुशलच्या प्रत्येक पोस्टला नेटकरी भरभरुन प्रतिसाद देत असतात. यात अलिकडेच त्याने आपल्या आयुष्यातील एका खास व्यक्तीससाठी पोस्ट लिहिली आहे.
"आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असं कुणीतरी असतंच नाहिका ? ज्याला आपण काहीही न सांगता, आपल्या मनातलं सगळं कळतं, आपल्या वेदनेशी एकरूप होणारी, अशी एकतरी व्यक्ती लागतेच आपल्याला जगण्यासाठी- सुकून", अशी पोस्ट कुशलने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
कुशलच्या या पोस्टवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यात खासकरुन अभिनेत्री अभिज्ञा भावेची कमेंट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कुशल मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून तो दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. तसंच त्याने काही गाजलेल्या सिनेमांमध्येही काम केलं आहे.