Join us

ललित प्रभाकरचं युनिक टॅलेंट; गिटारवर सादर केलं बालगीत, व्हिडीओ पाहून हसू होईल अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 13:52 IST

Lalit Prabhakar: ललितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

मराठी कलाविश्वातील हँडसम हंक म्हणजे ललित प्रभाकर. उत्तम अभिनय आणि पर्नालिटीच्या जोरावर ललितने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. यात तरुणींमध्ये तर त्याची कमालीची क्रेझ आहे. यात सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.  या व्हिडीओमध्ये त्याने चक्क गिटारवर बालगीत सादर केलं आहे.

ललित सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून तो कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पहिल्यांदाच तो त्याच्या भावासोबत दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये त्याचा भाऊ छान गिटारवर वाजवत आहे. याच वेळी यात एक ट्विस्ट घडतो. त्याच्या भावाने गिटाप वाजवणं बंद केल्यानंतर ललितने गाणं गायला सुरुवात केली.

ललितने चक्क 'ससा रे ससा' हे बालगीत म्हणायला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याचा हा अंदाज पाहून त्याचा भाऊदेखील चक्रावून गेला आणि त्याला हसू अनावर झालं. ललितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्याच्या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

टॅग्स :ललित प्रभाकरसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन