Join us  

'लक्ष्मीकांत टायमिंगचा हिरो होता'; 'बनवाबनवी'चा किस्सा सांगत अशोकमामांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 3:51 PM

Ashok saraf: लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी मराठी कलाविश्वाचा एक काळ गाजवला.

कलाविश्वात बऱ्याचदा कलाकारांमध्ये शीतयुद्ध सुरु असल्याचं पाहायला मिळतं. यात बऱ्याचदा एकमेकांची प्रगती, यश डोळ्यात खटकू लागलं की प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या एकमेकांवर टीकास्त्र डागायला सुरुवात होते. मात्र, या स्पर्धेमध्ये अशोक सराफ ( Ashok saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे ( Laxmikant berde) ही जोडी अपवाद होती. दोन्ही कलाकार त्या काळी सुपरस्टार होते. दोघांचंही यश एकमेकांच्या तोडीचं होतं. मात्र, त्यांच्यात कधीही हेवेदावे, मतभेद किंवा शीतयुद्ध रंगल्याचं दिसून आलं नाही. उलटपक्षी त्या दोघांनीही एकमेकांचा आदर केला. याचा प्रत्यय नुकत्याच एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी दिली.

काही काळापूर्वी अशोक सराफ यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी अशी ही बनवाबनवी या सिनेमाविषयी भाष्य केलं. याविषयी बोलत असतानाच त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाविषयी व्यक्तव्य केलं. लक्ष्मीकांत टायमिंगचा हिरो होता, असं म्हणत त्यांनी अशी ही बनवाबनवीमधील एक किस्सा सांगितला.

"अशी ही बनवाबनवी सिनेमातील धनंजय माने इथेच राहतात का हा संवाद लिहिलेला होता. पण, त्यावेळी लक्ष्याचं जे टायमिंग होतं ना, की दरवाजा फिरवून पटकन दार वाजवणं हे इतकं उत्कृष्ट जमून गेलं. लोकांना ते फार आवडलं. आणि, इथेच दिसून येतं की लक्ष्मीकांत खरा टायमिंगचा हिरो होता", असं अशोक सराफ म्हणाले.

दरम्यान, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जणू जोडगोळीच होती. या जोडीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली. अशी ही बनवाबनवी, धरलं तर चावतंय, अफलातून, धुमधडाका, आयत्या घरात घरोबा, प्रेम करुया खुल्लमखुल्ला, बाळाचे बाप ब्रह्मचारी अशा कितीतरी सिनेमांमध्ये त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली. 

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेअशोक सराफसेलिब्रिटीसिनेमा