अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांचा आगामी 'राजकारण गेलं मिशीत' हा सिनेमा रिलीज होत आहे. लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी असताना राजकारणावर भाष्य करणारा सिनेमा असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सध्याच्या राजकारणातले अनेक संदर्भ घेत ते मिश्किलपणे दाखवण्याचा प्रयत्न सिनेमात करण्यात आला आहे. हा सिनेमा जितका खळखळून हसवतो तितकाच तो अंतर्मुखही करेल असा आहे हे नुकतंच मकरंद अनासपुरे यांनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
'राजकारण गेलं मिशीत' सिनेमाचं दिग्दर्शन स्वत: मकरंद अनासपुरे यांनीच केलं आहे. यामध्ये त्यांनी नथोबा सोनवणे ही भूमिका साकारली आहे. सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने मकरंद अनासपुरेंनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांना सध्याच्या राजकारणातली खटकणारी गोष्ट कोणती असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, "सध्याच्या राजकारणाचा स्तर खालावत चालला आहे हे तथ्य आहे. म्हणजे आताच्या राजकारणावर हसायचं की रडायचं की त्यांना फटकारायचं हाच प्रश्न पडतो. तसंच मतदार विचार करुन एकाला मत देतो. पण नंतर जेव्हा राजकारणी त्यांची त्यांची समीकरणं परस्पर बदलून घेतात तेव्हा मात्र खटकतं."
मकरंद अनासपुरे यांनी याआधी राजकीय पार्श्वभूमी असलेले अनेक सिनेमे केले. यामध्ये 'खुर्ची सम्राट', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा', 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' या सिनेमांचा समावेश आहे. हाही सिनेमा तुम्हाला हसवेल आणि शेवटी अंतर्मुखही करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिनेमात मकरंद अनासपुरे यांच्यासह प्रकाश
अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा आगामी 'राजकारण गेलं मिशीत' हा सिनेमा रिलीज होत आहे. लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी असताना राजकारणावर भाष्य करणारा सिनेमा असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सध्याच्या राजकारणातले अनेक संदर्भ घेत ते मिश्किलपणे दाखवण्याचा प्रयत्न सिनेमात करण्यात आला आहे. हा सिनेमा जितका खळखळून हसवतो तितकाच तो अंतर्मुखही करेल असा आहे हे नुकतंच मकरंद अनासपुरे यांनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
'राजकारण गेलं मिशीत' सिनेमाचं दिग्दर्शन स्वत: मकरंद अनासपुरे यांनीच केलं आहे. यामध्ये त्यांनी नथोबा सोनवणे ही भूमिका साकारली आहे. सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने मकरंद अनासपुरेंनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांना सध्याच्या राजकारणातली खटकणारी गोष्ट कोणती असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, "सध्याच्या राजकारणाचा स्तर खालावत चालला आहे हे तथ्य आहे. म्हणजे आताच्या राजकारणावर हसायचं की रडायचं की त्यांना फटकारायचं हाच प्रश्न पडतो. तसंच मतदार विचार करुन एकाला मत देतो. पण नंतर जेव्हा राजकारणी त्यांची त्यांची समीकरणं परस्पर बदलून घेतात तेव्हा मात्र खटकतं."
मकरंद अनासपुरे यांनी याआधी राजकीय पार्श्वभूमी असलेले अनेक सिनेमे केले. यामध्ये 'खुर्ची सम्राट', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा', 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' या सिनेमांचा समावेश आहे. हाही सिनेमा तुम्हाला हसवेल आणि शेवटी अंतर्मुख करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिनेमात प्राजक्ता हणमघर, प्रकाश भागवत, डॉ. विजय देशमुख, डॉ. राजू सोनावणे, नितीन कुलकर्णी, बाळू मुकादम, प्रशांत जाधव, विनीत भोंडे, हरीश तिवारी, श्वेता पारखे, उन्नती कांबळे, रेश्मा राठोड, शैलेश रोकडे यांच्याही भूमिका आहेत. १९ एप्रिल रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.