दरवर्षी राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही जल्लोषात गणरायाचं आगमन झालं. दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज भाविकपो त्याच्या लाडक्या बाप्पाला निरोप देतील. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरही दरवर्षी बाप्पा विराजमान होतात. यंदाही धुमधडाक्यात वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
बॉलिवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांना वर्षा बंगल्यावरील गणेशोत्सवाचे आमंत्रण देण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणाला मान देऊन सेलिब्रिटींनी वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक मंगेश देसाईंनीही वर्षा बंगल्यावरील बाप्पाचे दर्शन घेतले. इन्स्टाग्रामवर याचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी खास पोस्ट लिहिली आहे.
मंगेश देसाईंची पोस्ट
गेल्या 60 वर्षात जो सोहळा वर्षा बंगल्यात घडला नाही तो मागच्या वर्षा प्रमाणे याही वर्षात झाला .गणेश दर्शन सोहोळा .संपूर्ण चित्रपट ,मालिका ,नाट्य सृष्टी वर्षा बंगल्यावर मा .मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या निमंत्रणाचा स्वीकारकरून गणेश दर्शन आणि स्नेहभोजनाला जमली होती .एखाद्या वास्तूत येतांना सकारात्मक उर्जेसह येणे आणि तशीच सकारात्मकता देऊन जाणे या पेक्षा मोठ्या शुभेछया कुठल्याच नाहीत .मा मुख्यमंत्री सगळ्यांना भेटून विचारपूस करत होते ,खासदार श्रीकांतजी प्रत्येकाला भेटून मनसोक्त गप्पा मारत होते .हे केवळ सामन्यांची जाणीव आणि कलावंतांवर प्रेम असेल तरच शक्य आहे .मलाही आरतीचा लाभ मिळाला .बाप्पा कडे एकच मागणं ,साहेबांची प्रकृती उत्तम ठेव ,आणि पुढच्या वर्षात पुन्हा साहेबांच आमंत्रण सगळ्यांना येऊ दे आणि तुझं दर्शन घडू दे
मंगेश देसाईंसह मृण्मयी देशपांडे, सुप्रिया पाठारे, विशाल निकम, अपूर्वा नेमळेकर, सुकन्या मोने, श्रेया बुगडे, प्राजक्ता माळी या कलाकारांनीही वर्षावर गणरायाचे दर्शन घेतले.