Join us

Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 11:58 IST

Prasad oak: रामललाच्या दर्शनासाठी गेलेल्या मंजिरीने मराठमोळा साजशृंगार केला होता.

मराठी कलाविश्वातील ऑल राऊंडर अभिनेता म्हणून आज प्रसाद ओकने (prasad oak) त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नाटक, मालिका, सिनेमा या तीनही माध्यमांमध्ये सक्रीय असलेला प्रसाद सोशल मीडियावरही तितकाच अॅक्टीव्ह आहे. नुकतंच त्याने अयोध्येला जाऊन रामललाचं दर्शन घेतलं आहे. यासंबंधी एक पोस्टही त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

प्रसाद सोशल मीडियावर सक्रीय असून तो कायम त्याच्या पर्सनल आणि प्रोफेनशल लाइफचे अपडेट चाहत्यांना देत असतो.यात त्याने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने कुटुंबासह रामललाचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे मुंबई ते अयोध्यापर्यंतचा प्रवासही त्याने या व्हिडीओ दाखवला आहे.

दरम्यान, प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी गेलेल्या मंजिरीने छान मराठमोळा साजशृंगार केला होता. मंजिरीने काठपदराची साडी नेसली होती. सोबतच तिने नाकात नथही घातली होती.

टॅग्स :प्रसाद ओक अयोध्यासेलिब्रिटी