मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) सोशल मीडियावर किती अॅक्टिव्ह आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. प्रसादच्या सोशल मीडिया रिल्सची तर जोरदार चर्चा होते. अनेक रिल्समध्ये प्रसादसोबत त्याची बायको मंजिरी (Manjiri Oak) ही सुद्धा दिसते. सध्या प्रसादच्या अशाच एका व्हिडीओची चर्चा आहे. 'तर सगळ्या डिग्र्या...सगळं शिक्षण पाण्यात....' असं प्रसाद या व्हिडीओत म्हणतोय. आता नेमकी ही काय भानगड आहे? तर ते जाणून घेऊ.
तर या व्हिडीओची सुरूवात होते ती प्रसादच्या संभाषणानं. ''तुम्ही किती डिग्र्या घ्या, शिक्षण घ्या, स्कॉलरशीप मिळवा, दहावी-बारावी बोर्डात या ...पण ते एक वाक्य जेव्हा कानावर पडतं तेव्हा सगळं शिक्षण पाण्यात...'' आता ते एक वाक्य काय हे जाणून घेण्याची उत्सुकता तर तुम्हाला असणारच. तर त्यासाठी तुम्हाला सोबतचा व्हिडीओ बघावा लागणार.
पटतंय की नाही, असं कॅप्शन देत प्रसादने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. भयंकर अपमान तुमच्या डोळ्यात दिसला, असं एका चाहत्याने लिहिलं आहे. डिग्री वाचवायची तर लग्न न केलेलं बरं हो... वाचलो, अशी मजेशीर कमेंट अन्य एका युजरने केली आहे. सगळ्या बायकांना उगाच बदनाम केलय या पुरूषांनी, अशी एक कमेंटही एका चाहत्याने केली आहे. लवकर सांगायला पाहिजे होतं दादा, असं एका चाहत्याने म्हटलं आहे. म्हणून मी जास्त शिकत नाही, अशी कमेंटही कमेंट बाॅक्समध्ये पाहायला मिळतेय.
प्रसाद ओकने काही दिवसांपूर्वी 'धर्मवीर' या गाजलेल्या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. आता चाहत्यांना दुसऱ्या भागात काय पहायला मिळतंय याची उत्सुकता लागली आहे.