प्रसाद ओकने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. प्रसादला खूपच चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे. प्रसाद एक चांगला अभिनेता असण्यासोबतच एक खूप चांगला दिग्दर्शक देखील आहे आणि त्याने हे सिद्ध देखील केले आहे. प्रसादने कच्चा लिंबू, हिरकणी या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. प्रसादच्या कच्चा लिंबू या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच हिरकणी या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
प्रसादच्या चाहत्यांना प्रसादविषयी जाणून घेण्यात नेहमीच रस असतो. प्रसाद सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असून तो त्याचे, त्याच्या कुटुंबीयांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. प्रसादच्या पत्नीचे नाव मंजिरी असून त्यांना दोन मुलं देखील आहेत.
मंजिरी आणि प्रसादचे लव्ह मॅरेज झाले आहे. 1997 मध्ये झाला दोघांचा साखरपुडा आणि त्यानंतर 7 जानेवारी 1998 रोजी प्रसाद आणि मंजिरीचे लग्न झाले आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रमात, पार्टीच्या ठिकाणी मंजिरी नेहमीच प्रसादसोबत दिसते. प्रसादच्या संघर्ष काळात ती प्रसादच्या मागे सावली सारखी उभी होती. मंजिरीच्या सांगण्यावरुन प्रसादने कायमस्वरुपी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला होता. प्रसाद आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या या यशात पत्नी मंजिरीचा सिंहाचा वाटा आहे असे म्हणायला हरकत नाही.
प्रसादच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला अनेक फोटोंमध्ये मंजिरी आणि त्याच्या मुलांना पाहायला मिळते. प्रसादची दोन्ही मुले मोठी आहेत. त्याचा मोठा मुलगा तर कॉलेजमध्ये आहे. पण तरीही प्रसाद आणि त्याची पत्नी आजही एखाद्या नवविवाहित जोडप्याइतकेच सुंदर दिसतात.