Join us

प्रशांत दामलेंवर कोसळला दुःखाचा डोंगर, हरपलं आईचं छत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 14:24 IST

Prashant Damle : प्रशांत दामले यांची आई विजया दामले यांचे आज निधन झाले.

मराठी रंगभूमी जगलेले नट म्हणजे प्रशांत दामले (Prashant Damle). प्रशांत दामलेंनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. दरम्यान प्रशांत दामले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आईचे निधन झाले आहे. 

प्रशांत दामले यांची आई विजया दामले यांची आज सकाळी १० वाजता प्राणज्योत मालवली. त्या ९२व्या वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज अंधेरी येथील आंबोली स्मशानभूमीत दुपारी साडे तीन -चारच्या दरम्यान अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

टॅग्स :प्रशांत दामले