Join us

"हा सिनेमा नाही तर...", अभिनेता प्रथमेश परबची 'छावा' चित्रपटावर प्रतिक्रिया, म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 11:08 IST

'छावा' चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल खूप उत्सुकता होती.

Prathamesh Parab On Chhaava Movie:विकी कौशल (Vicky kaushal) आणि रश्मिका मंदानाची (Rashmika Mandanna) मुख्य भूमिका असलेल्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ग्रँड ओपनिंग केली आहे. अगदी निर्मात्यांकडून घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती. अखेर १४ फेब्रुवारीच्या दिवशी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. दरम्यान, 'छावा' चित्रपट पाहून चाहत्यांसह कलाकार मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अशातच 'छावा'सिनेमासाठी अभिनेता प्रथमेश परबने (Prathamesh Parab) सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

नुकताच अभिनेता प्रथमेष परबने इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने 'छावा' चित्रपटाला समर्पित एक सुंदर कविता म्हटली आहे. दरम्यान, प्रथमेशने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलंय की, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढ़े, उन पर हे धिक्कार...! हा सिनेमा नाही एक अनुभव आहे..., धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय...! अशा शब्दांत अभिनेत्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

'छावा'ने बॉलिवूडला २०२५ वर्षाची दमदार सुरुवात करून दिली आहे. सध्या सर्वच स्तरातून चित्रपटाचं प्रचंड कौतुक होत आहे, तसेच कमाईतही सातत्याने वाढ होत आहे. या मल्टिस्टारर चित्रपटात अनेक मराठी कलाकार देखील झळकले आहेत.  संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, किरण करमरकर तसेच दमयंती पाटकर असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. 

टॅग्स :प्रथमेश परबमराठी अभिनेताविकी कौशलबॉलिवूडसिनेमा