Join us

MI ने पहिली मॅच हरल्यानंतर मराठी अभिनेत्याचा थेट जसप्रीत बुमराहला फोन, म्हणाला- "लवकर बरा हो"

By कोमल खांबे | Updated: March 24, 2025 12:36 IST

मुंबईने त्यांची 'पहिली मॅच देवाला' ही परंपरा कायम ठेवली. मुंबई इंडियन्सने मॅच हरल्यानंतर मराठी अभिनेता प्रथमेश परबने थेट जसप्रीत बुमराहला फोन लावला.

आयपीएलच्या १८व्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे.  रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सने चेन्नईच्या संघापुढे १५६ धावांचं टार्गेट ठेवलं होतं. चेन्नईने ४ विकेट्स राखून मुंबई इंडियन्सला पराभूत करत यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवला. तर मुंबईने त्यांची 'पहिली मॅच देवाला' ही परंपरा कायम ठेवली. मुंबई इंडियन्सने मॅच हरल्यानंतर मराठी अभिनेता प्रथमेश परबने थेट जसप्रीत बुमराहला फोन लावला. 

MI vs CSKच्या सामन्यानंतर प्रथमेश परबची पत्नी क्षितीजा घोसाळकर हिने  एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती प्रथमेशला विचारते, "प्रथमेश तू तर म्हणालास की मुंबई इंडियन्सची टीम चांगली आहे. पण, पहिलीच मॅच हरली".  त्यावर प्रथमेश म्हणतो, "अगं पहिली मॅच आपण नेहमी हरतो. कारण, पहिली मॅच देवाची असते. आता बघ कसं फायनलपर्यंत पोहोचून फायनल जिंकतात ते...मुंबईची सवय आहे ना... ". त्यानंतर प्रथमेश व्हिडिओत जसप्रीत बुमराहला फोन करताना दिसत आहे. फोन करून तो म्हणतो, "हा बुमराह, लवकर बरा हो रे". प्रथमेशचा हा मजेशीर रील व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती. त्यामुळे विश्रांती घेत असल्याने बुमराह आयपीएलमधील सुरुवातीचे काही सामने खेळताना दिसणार नाहीये. आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्यात बुमराह खेळण्याची शक्यता आहे. सध्या तो बंगळूरूमधील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपचार घेत आहे. बुमराह एप्रिल महिन्यातच मुंबई इंडियन्सच्या संघात सामील होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५प्रथमेश परबजसप्रित बुमराह