Join us

जावईबापू जिंदाबाद! सासरच्या मंडळींचा थाटच न्यारा; प्रविण तरडेंना मिळालं अधिकाचं वाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 17:32 IST

Pravin tarde: स्नेहल तरडे सोशल मीडियावर सक्रीय असून तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अधिक महिना हा ३ वर्षांमधून एकदाच येतो. या महिन्यात भगवान विष्णूची पूजा केली जाते. इतकंच नाही तर जावयाला विष्णूचं रुप मानून त्याचा मानपान केला जातो. अधिक महिन्यात मोठ्या थाटात लेक आणि जावयाला आनारश्यांचं वाण दिलं जातं. विशेष म्हणजे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांच्या घरी अधिकमास साजरा केला गेला. यात अभिनेता प्रविण तरडे यांचाही त्यांच्या सासुरवाडीमध्ये मोठा मानपान करण्यात आला. अभिनेत्री स्नेहल तरडे हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

स्नेहल सोशल मीडियावर सक्रीय असून तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिची आई प्रविण तरडेला (pravin tarde) वाण देताना दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला तिने एक मजेशीर गाणं देखील प्ले केलं आहे.

 

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.  जावईबापू जिंदाबाद असं गाणं या व्हिडीओच्या मागे ऐकू येत आहे. स्नेहल आणि प्रविण तरडे यांचं लव्हमॅरेज आहे. स्नेहल सुद्धा प्रविणप्रमाणेच मराठी कलाविश्वात सक्रीय असून तिने अनेक गाजलेल्या ऐतिहासिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :प्रवीण तरडेसेलिब्रिटीसिनेमाअधिक महिना