Join us  

मराठमोळ्या अभिनेत्याच्या चिमुकलीचा गुलाबी साडी नेसून डान्स, क्यूट व्हिडिओ पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 11:32 AM

'गुलाबी साडी' गाण्यावर थिरकली मराठी अभिनेत्याची लेक, व्हिडिओ एकदा पाहाच

गेल्या कित्येक दिवसांपासून गुलाबी साडी हे मराठमोळं गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग असल्याचं पाहायला मिळत आहे. काही केल्या या गाण्याची क्रेझ कमी होत नाहीये. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. माधुरी दीक्षितपासून ते रेमो डिसुझापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी गुलाबी साडी गाण्यावर थिरकताना दिसले. आता मराठमोळ्या अभिनेत्याच्या लेकीलाही गुलाबी साडी गाण्याची भुरळ पडली आहे. 

पुष्कर जोग हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलेल्या पुष्करला 'जबरदस्त' या सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली. पुष्कर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही तो चाहत्यांना देत असतो. नुकतंच त्याने लेकीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये पुष्करची लेक गुलाबी साडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 

पुष्करची लेक फेलिशा हिने गुलाबी साडी गाण्यावर डान्स केला आहे. गुलाबी साडी नेसून मराठमोळा लूक फेलिशाने केल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. नाकात नथ घातलेली फेलिशा खूपच क्यूट दिसत आहे. गुलाबी साडी नेसून फेलिशाने केलेला डान्स पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत पुष्कर म्हणतो, "ट्रेंड फॉलो करायला उशीरच झाला, पण तरीही चांगलं आहे". पुष्करने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान, पुष्कर लवकरच 'धर्मा-दि एआय स्टोरी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा सिनेमा आहे.  काहीच दिवसांपुर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :पुष्कर जोगमराठी अभिनेतासेलिब्रिटी