Join us  

"जिवंत असताना एकटाच राहीन आणि गेल्यावर...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 2:59 PM

"खूप वापरुन घेतात, खूप फसवतात...", मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

पुष्कर जोग हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलेल्या पुष्करला 'जबरदस्त' या सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली. पुष्कर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही तो चाहत्यांना देत असतो.सध्या पुष्करच्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

पुष्करने त्याच्या इन्स्टास्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो- "सगळ्यांसाठी सगळं केलं, खरा वागलो...जेव्हा जेव्हा मेंटली खचतो, तेव्हा तेव्हा शोधतो...आपले कोण कोण...आई आणि मुलगी...नशीबवान आहेत सर्व ज्यांना खरे काळजी घेणारे मित्र आहेत. जिवंत असताना एकटाच राहीन बहुतेक. मी गेल्यावर कोणी कोणी यायचं त्याची लिस्ट देऊन जाईन मी...उगाचच किती वाईट वाटलं ह्याचा आव आणून येऊ नका...पण, अजून १२ वर्ष आहेत. नॅशनल अवॉर्ड, ऑस्कर जिंकायचंय माझ्या मराठी फिल्मसाठी...Legend होऊनच जाईन...लव्ह यू आई आणि फेलिशा...त्या सगळ्यांना आणि वेळेलाही थँक्यू ज्यांनी त्यांचे खरे रंग दाखवले".

याबरोबर त्याने आणखी काही पोस्टही शेअर केल्या आहेत. "मानो या ना मानो...खूप मोठा जलवा करूनच जाणार...माझे कुटुंबीय आणि माझ्या देशाला अभिमान वाटावं असं...ऑस्करमध्ये एक दिवस मी मराठी आणि हिंदीमध्ये भाषण देणार", असंही त्याने म्हटलं आहे. पुष्करने त्याचा एक फोटोही पोस्ट केला आहे. "थकतोय मी परमेश्वरा...एकटा लढतोय...खूप वापरुन घेतात...खूप फसवतात...मी जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत कायम लढत राहीन", असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं आहे. 

दरम्यान, पुष्करने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. बिग बॉस मराठीमध्येही तो सहभागी झाला होता. पुष्कर लवकरच 'धर्मा-दि एआय स्टोरी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा सिनेमा आहे.  काहीच दिवसांपुर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :पुष्कर जोगमराठी अभिनेतासेलिब्रिटी