Join us  

रस्त्यांवरील खड्ड्यांबद्दल अभिनेत्याची संतप्त पोस्ट; म्हणाला, 'आपण फक्त अवाढव्य टॅक्स भरत राहायचं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 9:54 AM

पुष्कर जोग हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो.

Pushkar Jog on potholes : पावसाने मुंबईत अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. सतत पाऊस सुरू असल्याने डांबरी रस्ते उखडून खड्डे (potholes) पडल्यामुळे जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.  ते बघून हेच काय स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे शहर, असा प्रश्न पडतो.  पावसाळ्यात दरवर्षी याचा नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतो. यावर अभिनेता पुष्कर जोगने (Pushkar Jog) संताप व्यक्त केला आहे. 

पुष्कर जोग हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. #जोगबोलणार या हॅशटॅगसह पोस्ट शेअर त्याने करत आपलं मत मांडलं आहे.  पुष्करने लिहिलं की, 'दरवर्षी तेच तेच...रस्त्यांवर खड्डे आहेत की आपण सगळे खड्ड्यात... ह्याचा ही सर्व्हे झाला पाहिजे ना? नाही नाही आपण काहीच बोलायचं नाही...आपण फक्त अवाढव्य टॅक्सेस भरत राहायचे...माणसांचा, लहान मुलांचा आणि महिलांचा जीव महत्वाचा आहे की नाही?'. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. 

पुष्कर जोगशिवाय, मराठी अभिनेत्री सुरभी भावेनेही रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडीओला  'मतदार गेले खड्ड्यात' असं कॅप्शन देऊन मुंबई महानगरपालिकेला टॅग केलं होतं. . पावसाळा चालू झाल्यापासून नेटकऱ्यांसह अनेक मराठी कलाकार हे मुंबईतल्या खड्ड्यांबद्दल राग व्यक्त करताना दिसून येतात. 

पुष्कर जोगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 'बिग बॉस' मराठी कार्यक्रमामुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. काही दिवसांपूर्वीच पुष्कर जोगचा 'मुसाफिरा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये पूजा सावंत, पुष्कराज, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी व पुष्कर जोग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.  पुष्करने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी सिनेमात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचे फॅन्स त्याच्या आगामी प्रोजेक्टची वाट बघत असतात.

टॅग्स :पुष्कर जोगखड्डेसेलिब्रिटीमुंबईमहाराष्ट्रपाऊस