Join us

Hi Uncle! जेव्हा विलासराव देशमुखांना जेनेलियाने मारली हाक; अशी होती सासरेबुवांची रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 13:05 IST

Riteish Deshmukh: रितेशने नुकताच जेनेलिया आणि विलासराव देशमुख यांच्या भेटीचा किस्सा सांगितला.

महाराष्ट्राचं लाडकं कपल म्हणून लोकप्रिय असलेली जोडी म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख ( Genelia Deshmukh) . कलाविश्वात भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या या जोडीने प्रेक्षकांच्या मनातही हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या दोघांची कायम चर्चा होताना दिसते. अलिकडेच रितेश-जेनेलियाने 'लोकमत फिल्मी'च्या Love Game लोचा या सेगमेंटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रितेशने जेनेलिया आणि विलासराव देशमुख (vilasrao deshmukh) यांचा एक किस्सा सांगितला.

 रितेशसोबत लग्न केल्यानंतर जेनेलियाने देशमुख कुटुंबात स्वत:ला अत्यंत सुंदरित्या सामावून घेतलं आहे. त्यामुळे जेनेलिया देशमुखांची सून कमी आणि लेक जास्त वाटतं. रितेशच्या आईसोबतही तिचं छान नातं आहे. असंच मैत्रीपूर्ण नातं तिचं विलासराव देशमुख यांच्यासोबत होतं. त्यामुळेच रितेशने या दोघांचा एक किस्सा शेअर केला.

"मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे वर्षा, त्या बंगल्याच्या मागे एक लॉन आहे. तिथे मी, जेनेलिया आणि काही मित्र गप्पा मारत बसलो होतो. आणि मला माहित नव्हतं की पप्पा तिकडून मागे चालत निघाले होते. तर त्यांना पाहून या (जेनेलिया) हाय अंकल असं जोरात म्हणाल्या. मी एकदम दचकलो की कोणाला म्हणतीये. तर, तिकडूनही पप्पा, हाय, हॅलो म्हणाले", असं रितेशने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, "इतके वर्ष माझे सगळे मित्र माझ्या घरी आले पण इतक्या जोरात त्यांना (पप्पांना) कोणीच हाय अंकल म्हटलं नव्हतं. तर मी म्हटलं इतक्या जोरात. तर ही सांगते, हो ते इतक्या लांब आहेत तर मग हळू कसं बोलणार. पण, हेच ते सुंदर रिलेशन आहे जे दिसून येतं."

दरम्यान, सोशल मीडियावर सक्रीय असलेली जेनेलिया कायम विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत असते. इतकंच नाही तर तिच्या मुलांवरही तिने चांगले संस्कार केले आहेत. त्यामुळे देशमुख सुनबाईंची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजासिनेमाबॉलिवूड