Join us

या गायिकेसोबत सचित पाटीलने केले आहे लग्न, पाहा त्याच्या पत्नीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 8:00 AM

सचितने एका प्रसिद्ध गायिकेसोबत लग्न केले असून त्याची पत्नी ही दिसायला एखाद्या अभिनेत्रीइतकीच सुंदर आहे.

ठळक मुद्देसचित पाटीलची पत्नी ही प्रसिद्ध गायिका असून तिने गायलेली अनेक गाणी हिट झाली आहेत. सचितच्या पत्नीचे नाव शिल्पा पै असून तिने आजवर अनेक गाणी गायली आहेत.

सचित पाटीलने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून त्याचे फॅन्स त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. आज आम्ही तुम्हाला तुमच्या या लाडक्या अभिनेत्याविषयी काही खास गोष्टी सांगणार आहोत. सचितने एका प्रसिद्ध गायिकेसोबत लग्न केले असून त्याची पत्नी ही दिसायला एखाद्या अभिनेत्रीइतकीच सुंदर आहे. सचितच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला त्याचे पत्नीसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात. 

सचित पाटीलने क्यों या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर सब कुछ है कुछ भी नही, रास्ता रोको यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले. त्यानंतर तो दिग्दर्शनाकडे वळला. त्याने दिग्दर्शित केलेल्या साडे माडे तीन या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली. त्यानंतर त्याने अवधुत गुप्तेच्या झेंडा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली. क्षणभर विश्रांती या चित्रपटात त्याने काम करण्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याने अर्जुन, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्याची राधा प्रेम रंग रंगली ही मालिका काही महिन्यांपूर्वी चांगलीच गाजली होती. 

सचित पाटीलची पत्नी ही प्रसिद्ध गायिका असून तिने गायलेली अनेक गाणी हिट झाली आहेत. सचितच्या पत्नीचे नाव शिल्पा पै असून तिने आजवर अनेक गाणी गायली आहेत. तिने मराठीसोबतच भोजपुरी भाषेत देखील गाणी गायली आहेत. सचितच्या क्षणभर विश्रांती या चित्रपटातील अनेक गाणी तिने गायलेली असून या गाण्यांना रसिकांची पसंती मिळाली आहे.

सचितच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला शिल्पाचे अनेक फोटो पाहायला मिळतात. त्या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. ते कमेंटच्या माध्यमातून नेहमीच याविषयी सांगत असतात.

टॅग्स :सचित पाटील