सचित पाटील ( Sachit Patil) हा सर्वांचा आवडता अभिनेता. आजवर अनेक मालिका, चित्रपटात तुम्ही त्याला पाहिलं असेलच. लवकरच सचित पाटील ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात झळकणार आहे. सचितच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यास अनेकांना उत्सुकता असणारच. तर आज आम्ही तुम्हाला सचितच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत. होय, सचितची पत्नीदेखील मनोरंजन विश्वात काम करते. ती एक लोकप्रिय गायिका आहे.
तिचं नावं शिल्पा पै (Shilpa Pai). शिल्पाने आजवर अनेक गाणी गायली आहेत. केवळ मराठी भाषेत नाही तर भोजपुरी भाषेतही अनेक गाण्यांना तिने आवाज दिला आहे. सचितच्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातील अनेक गाणी तिने गायलेली आहेत. (Sachit Patil’s Wife Shilpa Pai)
सचित सोशल मीडियावर अनेकदा बायकोसोबतचे फोटो शेअर करत असतो. सचितची बायको दिसायला कमालीची सुंदर आहे. अगदी मराठीच्या अभिनेत्रींइतकी सुंदर.
सचित लवकरच सोनाली कुलकर्णीसोबत ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा येत्या 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटात सोनाली कुलकर्णी व सचितसह सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल कुलकर्णी, भरत जाधव, आयुषी भावे, मनमीत पेम असे अनेक स्टार आहेत.