Join us

संजय मोने यांना जन्माच्या वेळी केलं होतं मृत घोषित; जाणून घ्या अभिनेत्याच्या जन्माचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 11:50 AM

Sanjay Mone : अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' या गाजलेल्या टॉक शोमध्ये संजय मोने यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्याच्या करिअरविषयी आणि पर्सनल आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला.

मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि तितकचं मनमिळावू व्यक्तीमत्त्व म्हणजे संजय मोने. दर्जेदार अभिनयाच्या जोरावर संजय मोने (sanjay mone) यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे संजय मोने खऱ्या आयुष्यात मस्तमौला व्यक्ती असून त्यांच्या जीवनात अनेक रंजक किस्से घडले आहेत. यात अलिकडेच त्यांनी एका मुलाखतीत त्यांच्या जन्माचा किस्सा सांगितला. हा किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.

अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' या गाजलेल्या टॉक शोमध्ये संजय मोने यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्याच्या करिअरविषयी आणि पर्सनल आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यात जन्माच्यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे या मुलाखतीची सुरुवात करत असतानाच सुलेखा यांनी या किश्श्यावर प्रकाश टाकला. ज्यामुळे हा किस्सा संजय यांनी उलगडून सांगितला.

संजय मोने यांच्या जन्माच्यावेळी काही वैद्यकीय अडचण निर्माण झाल्यामुळे बाळ किंवा आई या दोघांपैकी एकालाच वाचवायचं होतं. त्यावेळी कुटुंबियांनी संजय यांच्याऐवजी त्यांच्या आईला वाचवायचा निर्णय घेतला. परंतु, नियतीला काही वेगळंच मान्य होतं. आईसोबत संजय यांचाही सुखरुप जन्म झाला. ज्यामुळे बाळ आणि आई दोघांनाही वाचवण्यास डॉक्टरांना यश आलं.

"माझे  वडील त्याकाळात नाटकात काम करायचे. माझ्या जन्माच्या वेळी ते नागपूर दौऱ्यावर होते आणि माझ्या आईची अशी अवस्था होती. त्यावेळी आजोबांनाच निर्णय घ्यायचा होता. त्यामुळे माझ्या सुनेला वाचवा, असं आजोबांनी डॉक्टरांना सांगितलं. त्याप्रमाणे माझ्या आईला वाचवलं. पण, डॉक्टरांनी मलाही मोठ्या शर्थने वाचवलं. सगळं नीट झाल्यानंतर माझे वडील दौऱ्यावरुन आले आणि त्यांच्यात- आजोबांमध्ये काही तरी चर्चा झाली ज्यामुळे वडिलांनी नाटक सोडलं", असं संजय मोने म्हणाले.

दरम्यान, संजय मोने मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेता आहेत. खुलता कळी खुलेना मा,झिया प्रियाला प्रीत कळेना, अवघाची संसार, आभाळमाया, कानाला खडा, दे धमाल अशा कितीतरी त्यांच्या मालिका गाजल्या आहेत. 

टॅग्स :संजय मोनेसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा