Join us

मराठमोळ्या अभिनेत्याने आईवडिलांना गिफ्ट केली महागडी कार, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 18:27 IST

संतोष जुवेकरने त्याच्या आईवडिलांना महागडी कार भेट म्हणून दिली आहे. 

संतोष जुवेकर हा मराठी कलाविश्वातील राऊडी अभिनेता आहे. मोरया, झेंडा या सिनेमांतून घराघरात पोहोचलेल्या संतोषने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनंही जिंकली. संतोषचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरुन तो नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही चाहत्यांना देत असतो. संतोष जुवेकरने त्याच्या आईवडिलांना महागडी कार भेट म्हणून दिली आहे. 

त्याने याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत संतोषचे आईवडील नव्या गाडीबरोबर दिसत आहे. लेकाने दिलेल्या गिफ्टचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. संतोषने आईवडिलांना ह्युंडाई कंपनीची गाडी भेट दिली आहे. संतोषच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान, संतोषने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या रावरंभा या ऐतिहासिक सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. एका तमिळ जाहिरातीतही संतोष झळकला होता. 

टॅग्स :संतोष जुवेकरमराठी अभिनेतासेलिब्रिटी