ग्लॅमर दुनियेत स्वबळावर स्वत:चं स्थान निर्माण करणारे अनेक आहेत. अनेक खस्ता खात,स्ट्रगल करत अनेकांनी मनोरंजन विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मराठी चित्रपटसृष्टीतही असे अनेक कलाकार आहेत. पण याऊपरही कुणी तुमच्या वाटेत आडवा पाय टाकत असेल तर, तेव्हा काय करायचं? मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) याला नेमका हाच प्रश्न पडला आहे.संतोष जुवेकरची एक फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्याने नेमका हाच प्रश्न विचारला आहे.
‘खूप काही सहन करून आणि खूप घासून जेंव्हा तुम्ही कुठेतरी एका पायरीवर पोहोचता आणि अजून खूप काही करण्याच्या प्रयत्नात असता.... आणि अश्या वेळेला कुणी उगाच उंगल्या करत असतं, तुमच्या नावाने खिल्ली उडवत असतं, तुमच्या वाटेत आडवा पाय टाकत असतं..... तेव्हा काय करायचं? मग तो अगदी जवळचा असतो ज्याला आपण जवळच समजतो किंवा कोणी परका अनोळखी असतो. काय करायचं अश्या अडा..... चो..... च? तोडायचं की सोडायचं????’, असा सवाल त्याने या पोस्टमध्ये केला आहे. संतोष जुवेकरची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. त्याची ही पोस्ट कोणाला उद्देशून आहे, हे कळायला मार्ग नाही. पण त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
आधी जे करायचास तेच कर... दुर्लक्ष, असा सल्ला एका चाहत्याने त्याला दिला आहे. अशी लोक भेटणार आयुष्याच्या प्रत्येक वळणावर... पण ती तात्पुरती. अर्जुनासारखं फक्त माश्याच्या डोळ्यावर लक्ष ठेवा. बाकी दुनिया है तो दुनियादारी तो होगी ही..., असा सल्ला एका चाहतीने त्याला दिला आहे. इग्नोर करायचं.. नहीं तो येडा बनके पेडा खानेका, असं एका चाहतीने त्याला सुचवलं आहे. एका चाहत्याने मात्र, भाई.. एक घाव देन तुकडे तोडायचे. पुढे जाऊन जास्त त्रास देतात असे लोक, असा कडक सल्ला दिला आहे.
संतोष जुवेकर ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेतून मृणाल दुसानिस हिच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकला होता. आजच प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटातील ‘राजं आलं राजं आलं’ हे गाणं संतोषवर चित्रित झालं आहे.