Join us  

'All Eyes On Rafah'चे स्टेटस ठेवणाऱ्यांना मराठी अभिनेत्याने सुनावलं, म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 4:49 PM

इस्रायलने रफाहवर एअर स्ट्राइक केला होता. त्या हल्ल्यात निष्पाप जीव मारले गेले, म्हणून सोशल मीडियावर 'all eyes on rafah' ...

इस्रायलने रफाहवर एअर स्ट्राइक केला होता. त्या हल्ल्यात निष्पाप जीव मारले गेले, म्हणून सोशल मीडियावर 'all eyes on rafah' नावाने ही पोस्ट व्हायरल झालीय. या पोस्टमधून इस्रायलच्या कृत्याकडे जगाच लक्ष वेधलं जातंय. जगभरातून इस्रायलच निषेध होत आहे. जगातील नामवंत व्यक्ती, सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया युजर्सनी ही पोस्ट आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये ठेवली.  मराठी कलाकारांनीही  'all eyes on rafah'  असं लिहलेला फोटो स्टेटसला ठेवला. यावर अभिनेता सौरभ गोखलेने परखडपणे आपलं मतं माडलं आहे. 

विशेष म्हणजे,  'all eyes on rafah' या मुद्द्यावरुन दोन गट पडले असून, एकमेकांवर टीका-टिप्पणी केली जात आहे. सौरभ गोखलेने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे.  सौरभ गोखले याने 'all eyes on rafah' असं स्टेटस ठेवणाऱ्यांना टोला लगावला. सौरभने स्टोरीमध्ये लिहलं, 'स्वतःच्या घरी कामाला येणाऱ्या बाईंचं पोर शाळेत जाऊ शकतं की नाही, हे आम्हाला माहीत नाही, पण आमचं स्टेटस मात्र 'all eyes on rafah'. यासोबतच त्याने हसण्याचे इमोजीही वापरले आहेत. 

अभिनेत्री प्रियंका चोप्रा, दिया मिर्झा, करीना कपूर खान, आलिया भट्ट, वरुण धवन, तृप्ती डिमरी, समांथा प्रभू, फातिमा सना शेख आणि स्वरा भास्कर सारख्या कलाकारांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे 'All Eyes on Rafah' अशा पोस्ट शेअर केल्या. पण, त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.  माधुरी दीक्षितने ट्रोलिंगनंतर ही पोस्ट डिलीटही केली होती. दरम्यान, सौरभबद्दल बोलायचं झालं तर त्याने योद्धा, सर्व लाइन व्यस्त आहेत, राधा ही बावरी, तलाव यामध्ये काम केलं आहे. तो सोशल मीडियावर सक्रीय असतो. या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो.  

टॅग्स :सौरभ गोखलेसेलिब्रिटीबॉलिवूडमराठी अभिनेताइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षइस्रायल - हमास युद्ध