Join us

"तुमच्यामुळे फायदा होणार असेल तरच ते तुम्हाला सिनेमात घेतील", सयाजी शिंदेंनी सांगितलं इंडस्ट्रीचं भयानक वास्तव

By सुजित शिर्के | Updated: March 21, 2025 13:57 IST

"समोरच्याला तुमचा फायदा असेल तरच...", सयाजी शिंदेंचं मोठं वक्तव्य; नवोदित कलाकारांना उद्देशून म्हणाले...

Sayaji Shinde:सयाजी शिंदे (Sayaji Shinde) हे मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले अभिनेते आहेत. अभिनयासह सामाजिक क्षेत्रातही ते तितकेच सक्रिय आहेत. दरम्यान, सयाजी शिंदे दे नाव आता फक्त मराठीपुरतंच मर्यादित राहिलं नसून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदी, साऊथ सिनेसृष्टीतही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सयाजी शिंदे यांनी अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांना तसेच नवोदित कलाकारांना उपदेशाचे डोस दिले आहेत. 

नुकतीच सयाजी शिंदेंनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी नवोदित कलाकारांना मोलाचा सल्ला दिला आहे. त्यादरम्यान, मुलखतीमध्ये ते म्हणाले, "सगळ्या तरुणांना, तरुणांनी ज्याला कलाकार बनायचं असेल तर त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की, समोरच्याला तुमचा फायदा असेल तर तुम्हाला ते सिनेमात घेतात. सगळ्यांचा हा गैरसमज आहे मला इंडस्ट्रीत यायची इच्छा आहे. मला साऊथला यायची इच्छा माझ्या काही अटी नाहीत असं म्हणतात. तुमच्यामुळे त्यांना काही फायदा होणार असेल तेव्हा तुम्हाला ते सिनेमात घेतील. कारण तुमच्यामुळे त्यांचा सक्सेसरेट वाढणार आहे. असा गैरसमज अनेकांमध्ये असतो." 

पुढे सयाजी शिंदे यांनी म्हटलं, "आमचं टॅलेंट आहे आमचं नशीबच चांगलं नाही. या गोष्टी स्वत: ला कुरवाळण्याच्या आहेत. प्रॅक्टिकली तसं काही नसतं. माझं म्हणणं असं आहे की कलाकारांनी काम मागायला जायचं नसतं. म्हणजे त्यांना योग्य वाटेल असा तो रोल आपल्याला ते देतील. त्यामुळे आपण खूप चांगलं असलं पाहिजे आणि त्यांची गरज आपण व्हायला पाहिजे. तेव्हा ते आपल्याला संधी देतील."असं स्पष्ट मत सयाजी शिंदे यांनी मांडलं. 

टॅग्स :सयाजी शिंदेमराठी अभिनेतासेलिब्रिटी