Join us

"हे भाषण बाळासाहेबांची आठवण..धन्यवाद राजसाहेब", ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:00 AM

मंगळवारी ठाण्यात झालेल्या राज ठाकरे यांच्या भाषणावर शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पोंक्षे यांनी अनेक मराठी चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट असो, नाटक असो अथवा मालिका. या तिन्ही माध्यमांतून शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला असून, स्वत:चे वेगळेपण सिद्ध केले आहे. .साचेबद्ध पठडीत काम करण्यापेक्षा नवीन भूमिकांच्या माध्यमातून ते रसिकांच्या भेटीला येत असतात. शरद पोंक्षे यांच्या प्रत्येक भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. शरद पोंक्षे सोशल मीडियावर रोखठोकपणे आपलं मतं व्यक्त करत असतात. काल ठाण्यात झालेल्या राज ठाकरे यांच्या भाषणावर त्यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

शरद पोंक्षे यांना काल राज ठाकरेंचं भाषण ऐकताना बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. याबाबत त्यांनी राज ठाकरे यांचं आभार मानलेत. ''आजचं राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं.बऱ्याच काळान धारदार भाषण .हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण.धन्यवाद राजसाहेब.'' अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी केलीय. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अनेकांनी कमेंट्स बॉक्समध्ये आपण त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. त्यांच्या या पोस्टला बरेच लाईक्सदेखील आलेत. 

राज ठाकरे काय म्हणाले?प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन घरात केले पाहिजे. महाराष्ट्रात आम्हाला जातीय दंगली करायच्या नाहीत; परंतु राज्याच्या गृह खात्याने सर्व मौलवींना बोलावून मशिदींवरील भोंगे ईदपूर्वी ३ मेपर्यंत उतरवायला भाग पाडावे. तसे झाले नाही तर जेथे भोंगे सुरू असतील तेथे हनुमान चालीसा वाजवली जाईल. माझ्या भात्यात आणखीही बाण आहेत. मला ते बाहेर काढायला लावू नका,’ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी येथे दिला.

राज म्हणाले की, ‘यापूर्वी वेळोवेळी मशिदीवरील भोंग्यांबाबत आपण भूमिका घेतली आहे. नमाज पढण्यासाठी रस्ते, फुटपाथ अडवणे व बारा महिने लाऊडस्पीकर लावण्यास आपला विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकर लावू नये, असे मत व्यक्त केले आहे; परंतु मतांकरिता निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही, त्यामुळे सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा, अन्यथा अन्य धर्मीयांना कसा त्रास होतो, ते हनुमान चालीसा लावून दाखवावे लागेल.’

टॅग्स :शरद पोंक्षेराज ठाकरे