Join us

महेश मांजरेकरांच्या अडचणीच्या काळात शिवाजी साटम आलेले धावून, केली होती पैशांची मदत, काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 09:12 IST

"मला पैशांची गरज होती अन्...", महेश मांजरेकर यांना कठीण काळात शिवाजी साटम यांनी केलेली मदत; म्हणाले...

Mahesh Manjrekar: लोकप्रिय मराठी दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते म्हणून महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची ओळख आहे. नुकताच त्यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, महेश मांजरेकर हे लवकरच देवमाणूस या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटामध्ये ते अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याबरोबर प्रमख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. याचनिमित्ताने त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आयुष्यातील काही कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. 

अलिकडेच महेश मांजरेकर यांनी तारांगण सोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील संघर्ष काळावर भाष्य केलं आहे. त्या काळामध्ये  मला शिवाजी साटम यांनी मदत केली होती, असं त्यांनी सांगितलं. यावर बोलताना ते म्हणाले, "माझा काही प्रॉब्लेम असला तर शिवाजी साटम नेहमी धावून आला आहेत. एकदा मला आठवतंय की, तेव्हा अडचणीत होतो. मी एकटाच बसलो होतो, काय करायचं याचा विचार करत होतो. अचानक दरवाजाची बेल वाजली पाहिलं तर त्याचा मुलगा होता. काका पप्पांनी पाठवलंय, 'मी त्याला विचारलं की काय रे? तो म्हणाला मला पार्सल द्यायचं आहे.' त्यामध्ये शिवाजी साटम यांनी मला दोन लाख रुपये पाठवले होते. खरंच, तेव्हा मला पैशांची गरज होती."

पुढे ते म्हणाले, "त्यानंतर मी त्यांना विचारलं की काय रे? त्यावर ते म्हणाले 'ठेव तू मला माहितीये'. हे सगळं त्याला कसं माहिती असतं मला अजूनपर्यंत कळालेलं नाही."असा खुलासा महेश मांजरेकर यांनी केला. 

दरम्यान, 'देवमाणूस' हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टॅग्स :महेश मांजरेकर शिवाजी साटममराठी अभिनेता