Join us  

'ट्रोलर्सचं कायमच स्वागत,पण...' कलाकारांना विनाकारण ट्रोल करणाऱ्यांना श्रेयसने दिली समज

By शर्वरी जोशी | Published: September 29, 2021 6:10 PM

Shreyas talpade: बऱ्याचवेळा कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. यात काही ट्रोलर्स त्यांची पातळी सोडून कलाकारांना त्यांच्या पर्सनल आयुष्यावरुन ट्रोल करतात.

आपल्या स्मित हास्यामुळे असंख्य तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. गेले कित्येक वर्ष टेलिव्हिजनपासून दूर असलेला हा अभिनेता माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत झळकत आहे. तब्बल १७ वर्षांनी मराठी कलाविश्वात पुन्हा एकदा अभिनय करण्यासाठी सज्ज झालेल्या श्रेयसला पाहून अनेक जण आनंदित झाले आहेत. त्यामुळेच त्याची मुख्य भूमिका असलेली ही मालिका आज सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. परंतु, चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमासोबतच अनेकदा कलाकारांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. त्यामुळेच अशा ट्रोलिंगला कलाकार कशाप्रकारे हाताळतात हे श्रेयस तळपदेने 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

'माझी तुझी रेसीमगाठ' या मालिकेत अलिकडेच दाखवण्यात आलेल्या एका सीनवरुन अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि श्रेयस या दोघांना ट्रोल करण्यात आलं होतं.  या सीनमध्ये विमानाला रेल्वेच्या खिडक्या बसवण्यात आल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी मालिकेला ट्रोल केलं होतं. परंतु, या ट्रोलर्सला आता श्रेयसने उत्तर दिलं आहे.

सुहाना खान ते न्यासा देवगणपर्यंत; विदेशातील 'या' विद्यापीठांमध्ये स्टारकिड्स  घेतायेत शिक्षण 

"बऱ्याचदा कोणत्याही किरकोळ कारणावरुन ट्रोलिंग केलं जातं. परंतु, काही गोष्टी विनोद पद्धतीनेच घेतलेल्या बऱ्या असतात. पूर्वी आम्ही कोणताही डायलॉग अगदी बिंधास्तपणे बोलायचो. परंतु, आता तोच डायलॉग बोलताना १० वेळा विचार करावा लागतो. कारण, नकळतपणे आपल्याकडून एखादं वाक्य किंवा शब्द निघाला आणि त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या. वा, कोणाला वाईट वाटलं तर काय करणार? मुळात कोणाला दुखवायचा हेतू नसतो. परंतु, असं कधी-कधी होऊ शकतं", असं श्रेयस म्हणाला.

नववधू प्रिया मी बावरते! सुबोध भावेच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का? 

पुढे तो म्हणतो,  "मला वाटतं आपण सगळ्यांनी थोडं रिलॅक्स राहण्याची गरज आहे. ट्रोलिंग किंवा मीम्स करावेत. पण, त्यालाही एक मर्यादा असावी. कोणीही आपली लिमिट क्रॉस करु नये. हलकी-फुलकी मस्करी किंवा ट्रोलिंग करावं. अशा ट्रोलर्सचं स्वागतही आहे. परंतु, हे ट्रोलिंग करताना कुठेही मर्यादा ओलांडली जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच प्रत्येक मालिका, चित्रपट यांचं बजेट वेगवेगळं असतं. त्यातूनही आमच्या बजेटमध्ये आम्ही खूप काही प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरीदेखील अनेकदा आमची खिल्ली उडवली जाते."

दरम्यान, बऱ्याचवेळा कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. यात काही ट्रोलर्स त्यांची पातळी सोडून कलाकारांना त्यांच्या पर्सनल आयुष्यावरुन ट्रोल करतात. त्यामुळेच अशा ट्रोलर्सला श्रेयसने शेलक्या शब्दांत फटकारलं आहे. 

टॅग्स :श्रेयस तळपदेसेलिब्रिटीटिव्ही कलाकारट्रोल