Join us

"धन्य धन्य ते संताजी-धनाजी...", 'छावा' फेम शुभंकर एकबोटेने शेअर केले युद्धप्रसंगाचे पडद्यामागील क्षण 

By सुजित शिर्के | Updated: February 22, 2025 11:00 IST

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास एक आठवडा उलटला आहे.

Shubhankar Ekbote: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास एक आठवडा उलटला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. सध्या या चित्रपटाचं त्यातील कलाकारांचं सगळे कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान, 'छावा'मध्ये अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. शिवाय रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईंच्या तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे. सुव्रत 'जोशी, संतोष जुवेकर सारंग साठ्ये, शुभंकर एकबोटे, निलकांती पाटेकर, आस्ताद काळे या मराठी कलाकारांनी 'छावा' मध्ये आपल्या भूमिका उत्तम पद्धतीने साकारल्या आहे. अशातच या चित्रपटात सरसेनापती यांची भूमिका साकारणारा अभिनेता शुभंकर एकबोटेने (Shubhankar Ekbote) नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली  आहे. ही पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

दिवंगत मराठी अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा शुभंकर एकबोटे हा सुद्धा 'छावा' चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. चित्रपटात त्याने केलेल्या कामाची सर्वजण स्तुती करत आहेत. सध्या शुभंकरने इन्स्टाग्रामवर नुकतेच 'छावा' च्या शुटिंगदरम्यानचे काही पडद्यामागील क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. पोस्टद्वारे  त्याने चित्रपटातील युद्धप्रसंगाची झलक दाखवली आहे. अभिनेता अंकित शर्मा सुद्धा या फोटोमध्ये पाहायला मिळतोय. अंकितने 'छावा' मध्ये संताजी घोरपडे यांची भूमिका साकारली आहे. दरम्यान, शुभंकरने या पोस्टला कॅप्शन देत लिहिलंय, "धन्य धन्य ते संताजी-धनाजी..., 'छावा' चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण. BTS with संताजी आणि धनाजी."

पुढे अभिनेत्याने लिहिलंय, तुम्ही 'छावा' पाहिलात का? नसेल तर जरुर पाहा. छत्रपती संभाजी महाराज कि जय जय शिवराय..., हर हर महादेव...!", अशी पोस्ट अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

सध्या 'छावा' चित्रपटाची क्रेझ जगभरात आहे. व्हॅलेंटाईनच्या दिवशी १४ फेब्रुवारीला 'छावा' चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. 

टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदानाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा