Shubhankar Tawde: लोकप्रिय अभिनेते सुनील तावडे यांचा लेक शुभंकर (Shubhankar Tawde) देखील कलाविश्वात चांगलाच सक्रिय आहे. 'कागर' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेता शुभंकर तावडेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. सध्या रंगभूमीवर शुभंकरच्या "विषामृत" – गोष्ट विशाल अमृताची..." या नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा आहे. अशातच नुकताच अभिनेत्याचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. 'झी नाट्य गौरव २०२५' पुरस्कार दरम्यान अभिनेत्याने या नाटकादरम्यानचा एक किस्सा शेअर केला आहे.
झी मराठीच्या सोशल मीडियावर अकाउंटवर शुभंकरचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता विषामृत नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडलेला किस्सा सांगताना म्हणतो, "स्टेजवरच्या किस्स्यांपेक्षा आम्हाला जेव्हा लोक भेटायला येतात तेव्हा तिकडे जास्त किस्से घडतात, मला तरी असं वाटतं. कारण विविध लोकं वेगळाच उत्साह घेऊन येतात. पहिल्यांदा कलाकारांना बघतात त्यानंतर नाटक बघितलेलं असतं तर त्यांच्या ते उत्साहित असतात.
पुढे शुभंकर म्हणतो, मला आठवतंय आम्ही कोल्हापुरात नाटक करत होतो आणि तेव्हा वीस ते पंचवीस बायकांचा ग्रुप आला होता. नेहमी काय होतं जेव्हा असं घडतं तेव्हा मला वाटतं की लोकं विषामृत बघायला आलेत. तर प्रियदर्शींच रिअॅलिटी शोमुळे फॅनफॉलोइंग आहे. तर त्या बायका नेमकं तिला सोडून त्या माझ्याकडे आल्या. त्यांना मी तेव्हा नमस्कार केला. त्या सगळ्या लाजून मला असं म्हणाला, "ओह माय गॉड... तुम्ही जेवढं पोस्टरवर किंवा आमच्या फोटोंमध्ये छान दिसता त्याच्यापेक्षा खूप छान आता समोर दिसता."आयुष्यात माझ्या गर्लफ्रेंडने किंवा एक्सने दाद दिल्यानंतर लाजलो नसेन तेवढा मी त्या दिवशी एका क्षणात लाजलो. कारण त्या गोष्टी माझ्यासाठी अनपेक्षित होत्या.
ती फिलिंग खूप छान होती
विचार करा ना म्हणजे येवढ्या सगळ्या बायका, ४०-४५ वयाच्या बायका जेव्हा एकत्र असं म्हणतात तेव्हा मला असं झालं की पहिल्यांदा मी पकडलो गेलोय. ती फिलींग खूप छान होती. त्या सगळ्या बायका मनापासून बोलल्या आणि एका स्माईलसाठी त्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिली. असा मजेशीर किस्सा अभिनेत्याने शेअर केला.